वसमत
प्रतिनिधि
वसमत येथील लिटल किंग्ज शाळेची विद्यार्थिनी कु. तेजस्विनी विठ्ठल अडकिणे हीची नुकतीच नवोदय विद्यालय वसमत येथे निवड झाली आहे.
तिने २९ एप्रिल २०२३ रोजी इय्यता पाचवीत असताना जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परिक्षा दिली होती.
तिची नुकतीच प्रतीक्षा यादी मध्ये नव्याने निवड झाली आहे.
यापूर्वी लिटल किंग्ज इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारी तिची बहीण कु. गायत्री विठ्ठल अडकिने हीची सुद्धा नवोदय विद्यालय वसमत येथे निवड झाली आहे. हे विशेष.
एलकेएम स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन अकादमी ही लिट्ल किंग्ज शाळेतील मुलासाठी विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेत असते. त्यात नवोदय, शिष्यवृत्ती परीक्षा, विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली जात आसते. त्यासाठी शाळा स्पर्धा परीक्षेची शाळेतच दोन तास वेगळी तयारी करून घेत असते.
याच माध्यमातून स्पर्धा परीक्षा विभाग सतत विद्यार्थ्याची दर पंधरा दिवसांनी प्रत्यक्ष ओयमआर सीट वर शाळा तयारी करून घेत असते.
कु. तेजस्विनी विठ्ठल अडकिने हिच्या यशाबद्दल हिंगोली जिल्हा शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के वसमत येथील पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुभाष सोनटक्के , जेष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी तान्हाजी भोसले, शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी, स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख श्री स्वामी सर शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी पालक विदयार्थी यांनी विशेष अभिनंदन करून पुढील शिक्षणासाठी शुभेछा दिल्या आहेत.