प्रविण गायकवाडचा दुट्टपीपणा
वसमत
प्रतिनिधी,
प्रविण गायकवाड
हे मराठा सेवा संघात कार्यरत असताना 2013 मध्ये त्यांचे ‘आरक्षण’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित झालेले आहे. सदर पुस्तक त्यांनी युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले (जे सध्या खासदार आहेत) यांना अर्पण केलेले आहे.
या पुस्तकात प्रवीण गायकवाड यांनी पानापानावर मराठा व कुणबी एकच असल्याने व कुणबी ओबीसीत असल्याने, मराठा समाजास ओबीसीमध्ये समाविष्ट करण्याची भूमिका घेतलेली होती. सोबतच आर्थिक निकषावरील आरक्षणापेक्षा मराठा समाजाने ओबीसीतील सामाजिक आरक्षण घ्यावे अशी भूमिका घेतलेली आहे. एवढेच नव्हे तर त्यावेळी अजित पवार यांनी मराठा समाजास आर्थिक निकषावर जी आरक्षणाची मागणी केली होती ती अत्यंत दुर्दैवी असल्याची भूमिका तेव्हा गायकवाड यांनी या पुस्तकातून घेतलेली आहे.
मात्र आज प्रवीण गायकवाड हे राजकीय लालसेपायी मराठा आरक्षणाबाबत अत्यंत घातकी भूमिका घेताना दिसत आहे, त्यांची सध्याची भूमिका मराठा समाजासाठी ‘कुर्हाडीचा दांडा गोतास काळ’ या पद्धतीची दिसून येत आहे. मराठा समाजाने त्यांचे आरक्षण हे पुस्तक व त्यांची परवाची tv वरील मुलाखत जर बाजूबाजूला ठेवून तपासले तर सत्य समोर येईल. ‘मराठयांना ओबीसी मध्ये न घालता इतरत्र आरक्षण द्या’ ही जी सध्या सर्व राजकीय पक्षांची वेळकाढू भूमिका आहे, तीस गायकवाड आपल्या tv वरील मुलाखतीतून दुजोरा देतात. तसेच गायकवाड आता असेही खोटे सांगतात की मराठ्यांची आरक्षणाची मूळ मागणी आर्थिक निकषावर होती. आर्थिक आरक्षण अधिक सोपे व सहज आहे. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागणे गैरलागू व चुकीचे आहे, ते सामाजिक स्वास्थ्य बिघडविणारे आहे, त्यामुळे मराठा व ओबीसी यांच्यामध्ये संघर्ष होईल, अशी अनेक मुक्ताफळे त्यांनी टिव्हिवरील मुलाखतीतून उधळलेली आहे. अर्थात राजकीय इप्सीताकरिता त्यांची ही खेळी आहे हे वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. मात्र स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी ते मराठा समाजाचे प्रचंड नुकसान करताहेत, माध्यमांमध्ये चुकीच्या भूमिका पसरविताहेत. 2013 मध्ये त्यांनी आरक्षण या त्यांच्या पुस्तकातून मराठ्यांचे ओबीसीकरण हाच एक पर्याय असल्याचे, आर्थिक आरक्षण चुकीचे असल्याचे जे योग्य भूमिका त्यांनी तेव्हा घेतली होती, त्यामध्ये अवघ्या 7 वर्षात नेमका बदल त्यांनी का केला हे मराठा समाजाने तपासणे औत्सुक्याचे आहे.
कारण प्रवीण गायकवाड हे सध्या शेतकरी कामगार पक्ष, नन्तर काँग्रेस आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे गुण गात आहेत ,
मुळात शरद पवार यांच्या मनात आले तर मराठा आरक्षण हा प्रश्न एका दिवसात सुटू शकतो पण शरद पवार हे जरी जातीने मराठा आसले तरी त्यांची मराठा समाजाला आरक्षण देण्याची अजिबात मानसिकता दिसत नाही उलट प्रवीण गायकवाड यांच्या माध्यमातून मराठा समाजाची दिशाभूल करून आरक्षण कसे मिळणार नाही हेच पवारी प्याटर्न राबवित आहेत , समाज एक दिवस याचा बदला नक्कीच घेईल असे एका प्रसिद्धी पत्रकात हिंगोली जिल्हा संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांनी म्हटले आहे