नाहक आकारणी खर्च बंद करा — प्रल्हाद इंगोले
वसमत
प्रतिनिधी
नांदेड हिंगोली जिल्ह्यातील केळी खरेदीदार व आडते यांनी केळी उत्पादक शेतकर्यांकडून अकारण व अवाजवी आकारणी बंद करून शेतकर्यांची लूट थांबवावी अन्यथा मनमानी करणार्या केळी खरेदीदारांवर शेतकरी सामूहिक बहिष्कार टाकतील व त्यांना कायदेशीर कार्यवाहीला ही सामोरे जावे लागेल असा इशारा शिवसेनेचे शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी केळी आडते व खरेदीदारांना दिला.जर एखाद्या केळी आडत्याने शेतकर्याची अडवणूक करून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर सर्व केळी उत्पादक शेतकरी शेतकरी त्या आडत्यांवर सामूहिक बहिष्कार टाकतील असा एकमुखी निर्धार शेकडो शेतकऱ्यांनी केला.
वसमत तालुक्यातील गिरगाव येथे केळी उत्पादक शेतकरी संघ यांच्या द्वारा आयोजित केळी परिषद घेऊन उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या केळी परिषदेसाठी हिंगोली सह नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी सहभागी झाले होते.
विशेषतः सर्व पक्षाचे पुढारी देखिल उपस्थित होते.
या केळी परिषद संवाद चर्चा सत्रात विविध वक्त्यांनी आपले विचार मांडले.
हिंगोली व नांदेड जिल्ह्यात फक्त अतिरिक्त खर्च लादल्या जातो जो ईतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तो नाही .
१७ टन गाडीत शेतकऱ्यांचे २५ – ३० हजार रुपये अवांतर पणे व्यापाऱ्यांकडून लाटले जातात .
हा एव्हडा फरक शेतकऱ्यांना का ?
हा प्रश्न अधोरेखित होतो असे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले यांनी उपस्थित केला.
या मध्ये विविध प्रकारच्या खर्च आकारणीवर चर्चा केली गेली .
त्यात गट पद्धतीने शेती करणे , भाव सार्वजनिक करून तो ठराविक असणे , कॅरेट चे वजन करणे ,दंडा वजन करणे , पत्ती न लावणे , ५०० ग्राम च्या वर वजन गृहीत धरणे , आणि केळी बागचा संबधीत व्यापाऱ्याने शेवट करणे या बाबतीत सर्व शेतकऱ्यांचे एकमत झाले
आहे.
ईतर सोलापूर ,कोल्हापूर ,जळगांव ,सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे खर्च लागत नाही तर मग नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना का ?
शेतकऱ्यांची हि आर्थिक पिळवणूक कुठे तरी थांबली पाहिजे म्हणून गिरगावच्या तरुण शेतकऱ्यांनी हि महत्वाची परिषद घेऊन एका नविन क्रांतीला सुरुवात केली आहे.
या केळी परिषेदेत नांदेड जिल्ह्यातील प्रमुख शेतकरी बारड ,मालेगाव , धामदरी , अर्धापुर येथील शेतकरी उपस्थित होते तर हिंगोली जिल्ह्यातील डोंगरखडा , पारडी ,कुरुंदा , दाभडी , वडगाव , रेडगाव ,दिग्रस ,येथील शेतकरी उपस्थित होते .
या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून खंडोजी माळवटकर , तर प्रमुख मार्गदर्शक शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले ,शेतकरी नेते बेगडराव गावंडे , डॉ किरण देशमुख , पंचायत समिती उपसभापती वसमत विजयराव नरवाडे ,पराग अडकीने , दिलीप इंगोले ,संभाजी बेले ,यशवन्त मामा ,प्रभाकर मोरे ,हनुमंत राजेगोरे ,रावसाहेब पाटिल ,शंकरराव कऱ्हाळे , जिल्हा परिषद सदस्य विलास रायवाडे ,विलासराव नादरे ,देविदास पाटिल ,रविंद्र नादरे , अशोक कऱ्हाळे , अरुनराव नादरे ,गंगाधर नादरे , माधव मालेवार ,मारोती केंचे , शिवप्रसाद रायवाडे , नामदेव साखरे , गिरगाव आणि पंचक्रोशीतील शेतकरी आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
दलाल व व्यापारी यांच्या मार्फत होणाऱ्या आर्थिक पिळवणूक बाबत दोन तास चर्चा केली गेली .
पुढील लढाईसाठी आम्ही सज्ज आहोत फक्त तुमची साथ राहु द्या असे आव्हान शेतकरी नेते प्रल्हाद इंगोले व बेगडराव गावंडे यांनी केले.
या केळी परिषदे साठी सुधाकर नादरे ,प्रताप नादरे ,
बंडू नादरे ,आकाश नादरे ,नितीन नादरे ,देव कऱ्हाळे , अंकुश नादरे , कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पत्रकार प्रमोद नादरे यांनी केले तर आभार प्रदर्शन भाई पाटिल कऱ्हाळे यांनी व्यक्त केले .