पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार
मराठा आरक्षण प्रश्नी खा संभाजीराजे भोसले यांना खासदारांचा पाठिंबा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटणार
विशेष प्रतिनिधी ,
नवी दिल्ली .
मराठा समाजाला मिळालेले आरक्षण टिकावे यासाठी गट-तट व पक्षभेद विसरून महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी एकत्र येण्याचे आवाहन राज्यसभेचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले होते त्या आव्हानाला चांगला प्रतिसाद मिळाला असून छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे आतापर्यंत जवळपास 15 खासदार यांनी पाठिंबा दिला असून
त्यांची नावे पुढील प्रमाणे –
खा. श्रीरंग आप्पा बारणे ( मावळ )
खा. हेमंत आप्पा गोडसे ( नाशिक )
खा. डॉ. श्रीकांत शिंदे ( कल्याण )
खा. धैर्यशील माने ( हातकणंगले )
खा. नवनीतकौर ताई राणा ( अमरावती )
खा. राहूल शेवाळे ( दादर )
खा. प्रतापराव जाधव ( बुलढाणा )
खा. ओमराजे निंबाळकर ( धाराशिव )
खा. डॉ. भारतीताई पवार ( दिंडोरी )
खा. हिनाताई गावित ( नंदुरबार )
खा. रक्षाताई खडसे ( रावेर )
खा. डॉ. प्रितमताई मुंडे ( बीड )
खा. डॉ. सुजय विखे पाटील ( नगर )
खा. उन्मेष पाटील ( जळगाव )
आ.रवी राणा
यांनी प्रत्यक्ष येऊन मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शविला आहे.
संभाजी राजे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून मराठा आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा निघावा यासाठी निवेदन देणार आहेत.
सक्रिय पाठिंबा दिलेल्या सर्व खासदारांचे समाजाच्या वतीने, ‘समाजाचा घटक’ या नात्यानेत्यांनी आभार व्यक्त कले आहे . आता बऱ्याच खासदारांनी संसदेत आवाज उठवायला सुरुवातही केली आहे, त्यांचेही समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतोअसे संभाजी राजे यांनी म्हटले आहे आणखी ही खासदार येऊन भेटणार आहेत.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागेपर्यंत राज्यात आणि केंद्रात सर्वांना सोबत घेऊन माझे प्रयत्न सुरूच राहतील.
असे छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी व्यक्त केले आहे