तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांचे मानधनात भरघोस वाढ
वसमत
शहर प्रतिनिधी
मागील एक- दोन वर्षांपासून तासिका तत्वावर काम करणाऱ्या वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक -प्राध्यापकांच्या वेतन वाढी संदर्भात शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या महाराष्ट धर्मनिरपेक्ष संघटनेच्या( MUST) मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून शिक्षकांच्या मानधनात भरघोस वाढ केली आहे . मानधन वाढीचा शासन आदेश आजच शासनाने जाहीर केला असून असून १ ऑक्टोबरपासून या वेतनवाढीची अंमलबजावणी होणार आहे .शासनाच्या या निर्णयाचे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेने स्वागत केले आहे. यापूर्वी पदविस्तरावर काम करणाऱ्या कला, वाणिज्य विज्ञान शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील शिक्षकांना केवळ ३०० रुपये प्रतितास एवढे तुजपुंजे मानधन मिळत होते पुढे ते प्रतितास ५०० रुपये करण्यात आले मात्र नव्या आदेशानुसार ६२५ रुपये प्रतितास इतके मानधन मिळणार आहे . जवळपास २५% इतकी वेतनवाढ देण्यात आली आहे . तसेच शारीरिक शिक्षण आणि विधी महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर शाखेतील शिक्षकांना ७५० रुपये प्रतितास मानधन मिळणार असून प्रात्यक्षिकाच्या मानधनात देखील कला, वाणिज्य विज्ञान शाखेसाठी रुपये २५० तर विधी आणि शारीरिक शिक्षण शाखेसाठी रुपये ३०० प्रतितास इतकी वेतनवाढ करण्यात आली आहे . MUST संघटनेने तासिका ऐवजी कॉन्ट्रॅक्ट सेवा द्यावी आणि त्यानुसार वेतन द्यावे अशी मागणी केली होती मात्र यात तांत्रिक अडचण असल्याने, शासनाने तासिका तत्वाचे मानधन 25% वाढवून दिले आहे.. गेली दोन वर्षे ‘मस्ट’संघटना शासनाकडे तासिका तत्त्वावरील शिक्षकांच्या मागण्या संदर्भात आग्रही होती आज मात्र या शिक्षकांना काही प्रमाणात का होईना न्याय मिळाला आहे अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष डॉ .प्रा. विजय पवार यांनी दिली असून उर्वरित मागण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करत राहू असे डॉ. प्रा. विजय पवारयांनी म्हटले आहे . शासनाच्या या ऐतिहासिक निर्णयाचे महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष संघटनेने स्वागत केले असून माननीय मुख्यमंत्री आदरणीय उद्धव ठाकरे साहेब , माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार , उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत .
तसेच संघटनेच्या या मागण्यासाठी शासनाकडे आग्रही मागणी करणाऱ्या संघटनेच्या प्रमुख सल्लागार आदरणीय आमदार प्रा. डॉ. मनीषा कायंदे मॅडम यांचे संघटनेने अभासर मानले असुन आमदार मनीषा कायंदे मॅडम यांनी या प्रकरणात भरघोस मदत केली आहे . तसेच संघटनेचे सल्लागार माननीय डॉ . सुधीर तांबे यांचे सुद्धा संघटनेने आभार मानले आहेत .
संघटनेच्या या लढ्यात महासचिव डॉ . शांतज देशभ्रतार ,उपाध्यक्ष डॉ. निलेंद्र लोखंडे, खजिनदार डॉ. निर्मला पवार ,प्रा डॉ बाळासाहेब भिंगोले यांनी भरीव योगदान दिले असून संघटनेच्या सर्व सदस्यांनी शासनाचे आभार मानले आहेत.