वसमत
शहर प्रतिनिधी
येथील आगारात दि.२७ रोजी कुसुमाग्रज यांची जयंती व मराठी भाषा गौरव दिन निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून वसमत आगाराचे आगार प्रमुखर या.य.मपडे हे होते तर उद्घाटक प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ संपादक उत्तम दगडू व पत्रकार नाहीद सिद्दीकी,डी.पी.ओ. सुभेदार, प्रदीप पातेकर यांची उपस्थिती होती
मराठी भाषा गौरव दिन या कार्यक्रमात
आपल्या अध्यक्षीय भाषणात आगारप्रमुख म्हणाले की, मराठी मायबोली भाषेवर आपल्याला खुप अभिमान असला पाहिजे प्रत्येकाने ठरवले पाहिजे की आपण दैनंदिन व्यवहारात जास्तीत जास्त मराठी भाषेचा उपयोग केला पाहिजे तर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले पत्रकार नाहीद सिद्दीकी
यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले की मराठी भाषा वाचवणे हे काम सरकारचे नाही तर हे काम प्रत्येक मराठी माणसाचे आहे मराठी भाषेचा सन्मान झालाच पाहिजे व आपली मातृभाषा मराठी भाषा दैनंदिन जीवनात बोलताना जास्तीत जास्त उपयोग केला पाहिजे तर ज्येष्ठ संपादक उत्तम दगडू यांनी आपल्या भाषणात म्हणाले की मराठी भाषेत उच्च शिक्षण घेऊन मोठ मोठया शहरात गेलेल्या व्यक्तींनी आपल्या मराठी भाषा मायबोलीचा विसर पडू देऊ नका व आज इंग्रजी शाळेत शिकणाऱ्या आपल्या पाल्यांना मराठीत जास्तीत जास्त संवाद करा असे मत व्यक्त केले या कार्यक्रमास चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी यांच्यासह प्रवासी उपस्थित होते सदरील कार्यक्रम चे सूत्रसंचालन या आगारातील अशोक गुळगुळे यांनी केले सदरील कार्यक्रम यशस्वी साठी वरिष्ठ लिपिक शेख जावीद, चरकपल्ली
यांनी मोलाचे कार्य होते