श्री योगानंद महाविद्यालयात सुशासन दिन व आजादी का अमृत महोत्सवाचे आयोजन
वसमत –
शहर प्रतिनधी
येथील श्री योगानंद स्वामी महाविद्यालयात भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न मा. अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिन म्हणून साजरा करण्यात आला. सुशासन दिन आणि आजादी का अमृत महोत्सव यानिमित्ताने ‘संविधानातील मूलभूत अधिकारांतर्गत माहिती अधिकार कायदा’ या विषयावर राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ .संजय गायकवाड यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. कमलाकर चव्हाण हे होते. तर डॉ.वर्षा दोडिया, प्रा.सुभाष ठोके, डॉ. किशन बाभुळगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले की, माहिती अधिकार कायद्यासंबंधी महाविद्यालयीन तरुणांनी सजग राहणे अत्यंत गरजेचे आहे. माहिती अधिकारामुळे सुशासन निर्माण होण्यास मदत होते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप डॉ. कमलाकर चव्हाण यांच्या भाषणाने झाला.यावेळी ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी संविधान आणि विविध कायद्याची माहिती करून घेतली पाहिजे. त्यामुळे आपणास मूलभूत अधिकारांची जाणीव होते.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुभाष ठोके यांनी केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन डॉ. किशन बाभुळगावकर यांनी केले. तर आभार डॉ. ज्ञानेश्वर गाडे यांनी मानले.या कार्यक्रमास प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.