बालरक्षक-शिक्षक शामराव रावले यांच्या प्रयत्नांना डॉ. सचिन खल्लाळ यांनी दिली साद
आज दिनांक 7 ऑगस्ट रोजी पालावरची शाळा शांतीनगर,आसेगाव कॉर्नर,वसमत येथे पालावरच्या शाळेतील 15 विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र व ज्यांनी आजपर्यंत कधीही मतदानाचा अधिकार मिळाला नाही अशा 31पात्र लाभार्थ्यांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून मतदार कार्ड मा. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ व उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
थोडक्यात पालावरच्या शाळेविषयी:
आसेगाव कॉर्नर, शांतीनगर वसमत जिल्हा हिंगोली येथे जवळपास 80 ते 100 कुटुंब कापडी पालात राहतात. जे एका कापडी पालात राहतात. याच पालात राहणाऱ्या स्थलांतरित कुटुंबातील व अत्यंत आर्थिक दुर्बल-दुर्लक्षित शाळाबाह्य-शिक्षणापासून वंचित निराधार मुला-मुलींना शिक्षणाची सुविधा व्हावी यासाठी पालावरच शाळा-अभ्यासिका सुरू करणारे बालरक्षक-शिक्षक श्याम रावले. यांच्या हाकेला साद देत उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ साहेब यांनी 19 ऑक्टोबर 2022 रोजी शैक्षणिक साहित्य वाटपाच्या निमित्ताने पहिल्यांदा पालावर आले.
आणि आपल्या मार्गदर्शनात रावले सर तुम्ही या ठिकाणी या मुलांच्या शिक्षणासाठी प्रयत्न करत आहात हे कौतुकास्पद बच आहे.सोबतच आमच्या कार्यालयाच्या माध्यमातून ज्या- ज्या सुविधा वस्तीतील नागरिकांना देण्यात येतील त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू.
आणि आज 7 ऑगस्ट ला आपण आपण आमच्या विनंतीला मान देत शाळेत जात असणाऱ्या विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र पात्र लाभार्थ्यांना मतदान कार्ड यादी पूर्वी आपण मुलांचे शिक्षण आधार कार्ड विना त्यांना शाळेमध्ये प्रवेश होत नव्हता हे मी लक्षात आणून दिल्यानंतर साहेबांनी लगेच आधार केंद्र संचालक श्री सचिन पत्रकार यांना माझ्या समोरच भेटीदरम्यान आदेशित केले व लवकरात लवकर हरवली सरांच्या पालावरच्या शाळेवर आधार कॅम्पचा नियोजन करा आणि लागलीच आधार कॅम्प नियोजन केलं आणि याची जिम्मेदारी समन्वयक म्हणून मला दिली. आम्ही एक दिवसभरात 65 लाभार्थ्यांना मा. खल्लाळ साहेबांच्या माध्यमातून आधार कार्ड दिले.जे पालक आपल्या मुलांना नेहमीच शाळेत पाठवीत आहेत या सर्व 31 परिवाराला आपण राशन कार्ड दिले सोबतच या ठिकाणी सहा दिव्यांग आहेत त्यांना दिव्यांग प्रमाणपत्र यु डी आय डी आय कार्ड देण्यासाठीचे ही कार्य आपल्या माध्यमातून झाले. सोबतच जे संजय गांधी निराधार योजने करिता पात्र असणाऱ्या पाच लाभार्थ्यांना आपण या ठिकाणी आपल्या माध्यमातूनच आपल्या मार्गदर्शनाने त्यांना संजय गांधी निराधार योजनेचा प्रतिमाह 1000 रुपये लाभ मिळत आहे.
या शासनाच्या सुविधांपासून कोसो दूर असणाऱ्या नागरिकांना आवश्यक सुविधा मिळवून दिल्याने आपली कर्तव्यनिष्ठता व संवेदनशीलता मा. खल्लाळ साहेब आपल्या कार्यातून दिसून येते.
आपण शांतीनगर वस्तीतील शिक्षणापासून वंचित मुलांचे शिक्षण सुरू राहण्यासाठी- पालकांच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी-आर्थिक सबळ होण्यासाठी नक्कीच आपण केलेले कार्य अतिशय मोलाचे ठरत आहे.
विमुक्त भटक्या समुदायातील मुलांच्या शिक्षणासाठी आपली तळमळ, आपली संवेदनशीलता नक्कीच यातून आम्हाला पहायला मिळते.
एकंदरीतच शेवटी प्रातिनिधिक स्वरूपात शालेय साहित्य पेन वही व मागील वर्षी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वाटप झाल्याच्या कार्यक्रमानंतर आपण या ठिकाणी आपल्या मनोगतात अशी भावना व्यक्त केली की हीच मुलं तुमच्या भविष्याची आशा आहेत त्यांना चांगल शिकवा. एक वेळेस अन्न कमी खाल्लं तरी चालेल, एक वेळेस उपाशी रहावं लागलं तरी चालेल पण तुमच्या मुलांना शिकवा.
मा.खल्लाळ साहेब आपली भावनिक साद नक्कीच आमच्या डोळ्यांमध्ये अश्रू आणणारी होती.
शिक्षणाची ही गंगा सर्व दूर पोहचली पाहिजे.शिक्षणापासून वंचित-शाळाबाह्य मुलांसाठी रावले सर तुम्ही पालावर येऊन आपल्या स्वतःच्या शाळेच्या वेळेशिवाय शिक्षणापासून वंचित मुलांसाठी कार्य करत आहात ते खरंच कौतुकास्पद आहे आणि तुमच्या मुळेच मला या वस्तीची ओळख झाली अन वस्तीमध्ये येता आलं.
नक्कीच साहेब बालरक्षक चळवळीला आपल्या वक्तव्याने नक्कीच बळ मिळेल. सर्वच ठिकाणी शिक्षक बांधव नक्कीच आपल्या या मार्गदर्शनातून प्रेरित होतील.
ही पालावरची शाळा सायंकाळी पाच ते साडे सहा या वेळेमध्ये असते.. या उपक्रमाचा फायदा शाळेत अनियमित,अस्थायी व शिक्षणापासून वंचित अश्या सर्व मुलांना होत आहे. यावर्षी पालावर स्थायी-अस्थ्यायी राहणाऱ्या 48 मुलांना बालरक्षक-शिक्षक शाम रावले यांनी शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले आहे. तसेच काही कामानिमित्त आपल्या छोट्याशा व्यवसाय किंवा मोलमजुरीच्या निमित्ताने आलेले परिवार आठ- दहा दिवस, पंधरा दिवस- महिनाभर या ठिकाणी राहतात त्यांच्या मुलांचे शिक्षण पालावरच्या शाळेमुळे होत आहे. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला.
पालावरच्या शाळेचे बालरक्षक शिक्षक शामराव रावले यांनी मा.सचिन खल्लाळ साहेब व सर्व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
या कार्यक्रमाला पालावरच्या शाळेतील विद्यार्थी, माता-पिता पालक उपस्थित होते.