टोकाई पहिला हप्ता 2000 रुपये ने देणार
वसमत
शहर प्रतिनिधी
टोकाई सहकारी साखर कारखान्यात या वर्षीच्या गळीत हंगामातील पहिल्या दहा साखर पोत्यांचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे चेअरमन एडवोकेट शिवाजीराव जाधव व संचालक मंडळ हस्ते पूजन करण्यात आले.
कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष एडवोकेट शिवाजीराव जाधव यावेळी म्हणाले की, टोकाई सहकारी साखर कारखान्याला ऊस देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. कार्यक्षेत्रातील सर्व ऊस मे महिन्याच्या अखेरपर्यंत गाळप केले जाईल असे प्रतिपादन एडवोकेट शिवाजीराव जाधव यांनी केले.
कारखाना तालुक्याची कामधेनु आहे. नियोजनबद्ध कार्यक्रम हाती घेऊन यशस्वी वाटचाल चालू आहे ऊस उत्पादक शेतकरी ,तोडणी वाहतूकदार, कारखान्याच्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी कारखाना व्यवस्थापन कटिबद्ध आहे. अनेक अडचणीवर मात करून हंगाम यशस्वी पार पडावा लागत आहे. शेतकऱ्यांचा सर्व उसाचे गाळप करण्यासाठी टोकाई सहकारी साखर कारखाना सज्ज असून पहिला हप्ता 2000 रुपये ने देणार असल्याचे एडवोकेट शिवाजीराव जाधव यांनी सांगितले
टोकाई सहकारी साखर कारखान्यात सन 2021 22 गळीत हंगामातील उत्पादित साखर पोत्यांचे विधीवत पूजन करण्यात आले. मागील वर्षीच्या उर्वरित एफआरपी चे पैसे तीन ते चार आठवड्यात शेतकऱ्यांना देणार असून तोडणी वाहतूक ठेकेदार यांचे मागील दोन वर्षाचे 75 टक्के पेमेंट त्यांच्या खात्यावर वर्ग केले असून उर्वरित 25% पेमेंट लवकरच देणार असून कारखाना कर्मचाऱ्यांचे थकित मागील दहा पगारा पैकी आठ पगार दिले असून उर्वरित पगार लवकरच देणार आहेत, वाढीव पगारातील फरक, ओव्हर टाईमचे पेमेंट दिले आहे. ऊस तोडणी वाहतूकदारांचे बिले पंधरवाडा ते पंधरवडा देणार असल्याचे सांगितले, कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस इतर कारखान्यास न देता टोकाई कारखान्यालाच द्यावा असे आवाहन एडवोकेट शिवाजीराव जाधव व संचालक शिवाजीराव सवंडकर, मारोतराव भोसले ,साहेबराव पतंगे, गजानन जाधव, देवानंद नरवाडे ,सदाशिव जाधव, मधुकराव पाष्टे, प्र.कार्यकारी संचालक केशव मालेगावकर यांनी केले.
साखर पोत्यांच्या पूजन प्रसंगी कुरुंदा पोलीस स्टेशनचे फौजदार सुनिल गोपीनवार, परजनाचे पोलीस पाटील तुकाराम गायकवाड , मनोज कन्नेवार,पंजाब नादरे,
अरविंद खराटे,राजेश भोसले, काशिनाथ जाधव, सूरज देशमुख,बाबासाहेब शिंदे,कुमार वारे,प्रभाकर तिडके, पिंटू सोनटक्के, गंगाजी बापू वारे, गोविंद जाधव यांच्यासह सर्व खाते प्रमुख, विभाग प्रमुख, अधिकारी, कामगार, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिक्रिया
आमच्या कारखान्यांने निर्यात केलेल्या साखरेचे केंद्र सरकारकडे 3 कोटी 90 लाख रुपये येणे बाकी आहे. त्यामुळे उर्वरित एफ.आर.पी ची रक्कम शेतकऱ्यांना देता आली नाही. ती तात्काळ मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे सतत पाठपुरावा करत आहोत. यासंदर्भात केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड, नितीन गडकरी व रावसाहेब दानवे यांची भेट घेतली असून निर्यात केलेल्या साखरेचे पैसे तीन ते चार आठवड्यात उपलब्ध करून देणार असल्याचे या भेटीत त्यांनी सांगितले. पैसे उपलब्ध होताच ते शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केले जातील.
एडवोकेट शिवाजीराव जाधव
चेअरमन
-टोकाई सहकारी साखर कारखाना लि कुरुंदा