शाळेचे अठरा विद्यार्थी पात्र तर सहा विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक
वसमत
प्रतिनीधी ,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिनांक 27 एप्रिल 2023 च्या प्रसिद्धीपत्रकानुसार पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतरिम निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने नुकताच घोषित केला असून, याही स्पर्धा परीक्षेत वसमत येथील लिटल किंग्ज शाळेच्या विद्यार्थ्यांनी यशाची उत्तुंग भरारी घेतली आसून आपली गुणवत्ता शाळेने पुन्हा सिद्ध केली आहे.
शाळेतील दोन्ही गटातून एकूण ३७ विद्यार्थी या परीक्षेत बसले होते त्यापैकी १८ विद्यार्थ्यांनी आपली गुणवत्ता गुणवत्ता सिद्ध केली असून ते या परीक्षेत पात्र झाले आहेत .
तर शाळेचे एकूण सहा विद्यार्थी स्कॉलरशिप पात्रता धारक झाले आहेत.
यात पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी मधून कु. गायत्री डरंगे , आरुष अंभोरे, कु. आर्या लोखंडे , कु. तेजस्विनी अडकिने, कु . दिव्या खिल्लारे. , सोहम आवटे वरद भोसले आणि मनीष काळे हे विद्यार्थी या परीक्षेत पात्र झाले असून कु. गायत्री डरंगे , कु, तेजस्विनी अडकिने आणि मनीष काळे हे विद्यार्थी स्कॉलरशिप पात्रता धारक झाले आहेत.
तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी मधून एकूण दहा विद्यार्थी पात्र झाले असून ज्यात तुषार अग्रवाल , सुरज चालक , कु. ऋतुजा शिंदे , कु. अदिती दाभाडे , ओंकार पतंगे , कु दिशा लोहटे , श्रीराम वडुळकर , कु. वैष्णवी नवघरे , कु. अक्षरा दातार आणि कु. इशिता माळवदकर या विद्यार्थ्यांचा समावेश आहे .
या गटात कु. दिशा
लोहटे , कु. ऋतुजा शिंदे आणि कु.आदिती दाभाडे या विद्यार्थिनीं स्कॉलरशिप पात्रता धारण झाल्या आहेत .
या सुरू शैक्षणिक वर्षापासून शाळेने शाळा सात तास केली असून, केवळ दोन तास विविध स्पर्धा परीक्षा मेडिकल आणि इंजीनियरिंग फाउंडेशन , इंग्रजी ,गणित आणि विज्ञान हे विषय शाळेतील विषय शिक्षक आगाव दोन तास शाळेतच शिकवणी द्वारे विशेष तयारी करून घेत आहेत. ज्यामुळे पालकांची बाहेर शिकवणी लावण्यासाठी वेळ व पैसा यांची बचत होणार आहे.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे त्यांचे विशेष शिक्षक , शाळेचे मुख्याध्यापक , संस्थापक प्रा. डॉ. नामदेव दळवी यांचे विशेष कौतुक हिंगोली जि. प. प्राथमिक चे शिक्षणाधिकारी श्री संदीप सोनटक्के , वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्री सुभाष सोनटक्के , ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्री तानाजीराव भोसले , केंद्रप्रमुख श्री दिलीप पंडित .
शाळेतील सर्व पालक विद्यार्थी यांनी विशेष कौतुक करून अभिनंदन केले आहे.