शाळेची स्पर्धा परीक्षेतील यशाची परंपरा कायम
वसमत
प्रतिनिधी ,
वसमत शहरातील एक प्रयोगशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल या शाळेने मागील अनेक वर्षाची परंपरा कायम ठेवली आहे ,यापूर्वी ही शाळेतील अनेक विद्यार्थी नवोदय परीक्षा उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालयात शिक्षण घेत आहेत , हीच परंपरा कायम राखत शैक्षणिक वर्ष 2021– 22 याही वर्षी शाळेची विद्यार्थीनी कु दिव्या दिगंबर तोंडेवाड ही नवोदय परीक्षेत पास होऊन नवोदय शाळेत प्रवेशास पात्र झाली आहे .
सदरील शाळेने मागील अनेक वर्षात विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षेत यश संपादन केले आहे एम टी एस , आर टी एस ई , ओलंपियाड,
होमीभाभा , इत्यादी स्पर्धा परीक्षेत आपले विदयार्थी बसवून गुणवत्तापूर्ण पास झाले आहेत
या यशाबद्दल केंद्रप्रमुख श्री वराड सर शिक्षणविस्तार अधिकारी श्री तान्हाजीराव भोसले , गटशिक्षणाधिकारी यांनी तसेच ,तिचे शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक , शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी मुख्याध्यापक गोविंद दळवी , संचालिका मीनाताई इंगोले क्रीडा शिक्षक संजय उबारे यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले आहे