वसमत शहरात विविध ठिकाणी लागणार लसीकरण कॅम्प -डॉ सनाउल्ला खान
वसमत प्रतिनिधी
लहान बालकांमध्ये खूप झपाट्यानं वाढत असलेल्या गोवर आजारावर नियंत्रणासाठी राज्य शासना कडून दि १५ ते २५ डिसेंम्बर गोवर रूबेला विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून वसमतकरांनी दिलेल्या तारखेत केंद्रावर उपस्थित राहून लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सनाउल्ला खान यांनी केले आहे
सध्या राज्यात वाढत असलेले गोवर या आजाराची लहान बाळांमध्ये चालू असलेली साथ लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाने गोवर रूबेला विशेष लसीकरण सत्र ठेवण्याचे दिशा निर्देश जारी केले आहे गोवर हा आजार मागच्या काही दिवसापासून लहान बालकांमध्ये खूप झपाट्यानं वाढत आहे या आजारामध्ये मुख्यत ताप येणे,अंगावर लाल चट्टे येणे अशा स्वरूपाचे सौम्य लक्षण आढळतात तर काही गंभीर स्वरूपाचे लक्षण जसे की निमोनिया व डोळ्याची दृष्टी कमी होणे असेही लक्षण आढळू शकतात त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विशेष मोहीम राबवून अशा आजारापासून बालकांना दूर ठेवण्याचे दिशा निर्देश जाहीर केले आहे
त्यामुळे विशेष लसीकरण सत्रांमध्ये नऊ महिने ते पाच वर्ष या वयोगटातील बालकांना गोवर व रूबेला लस देण्यात येणार आहे याचाच भाग म्हणून वसमत शहरात सुद्धा गोवर व रूबेला लसीकरण उद्या गुरुवार पासून सुरुवात होत आहे तरीही नऊ महिने ते पाच वर्ष या वयोगटातील कोणताही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता पालकांनी घ्यावी व लसीकरणाचा लाभ घेण्याचे आवाहन डॉक्टर सनाउल्ला खान यांनी केले आहे
वसमत शहरात तारीख निहाय घेण्यात येणाऱ्या लसीकरणाचा आराखडा सोबत जोडला आहे