मग विदर्भातील मराठा ओबीसीत तर मराठवाड्यातील का नाही ?
मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आलेल्या चिखलीच्या भाजपा आमदार श्वेताताई महाले यांच्यासमोर वसमतच्या सकळ मराठा समाजाचा तीव्र भावना !
शहर प्रतिनिधी
सुप्रीम कोर्टात रद्द झालेल्या मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर हिंगोली जिल्ह्यातील मराठा बांधवांच्या मराठा आरक्षण विषयक भावना समजून घेऊन त्या पक्ष नेत्रवाकडे सादर करण्यासाठी वसमत च्या शासकीय विश्रामगृह येथे उपस्थित बुलडाणा चिखली विधान सभा मतदार संघाच्या भारतीय जनता पार्टीच्या आमदार श्वेताताई महाले आल्या असता वसमत सकल मराठा समाजाच्या असंख्य बांधवांनी आपल्या आरक्षण विषयक मागणीला जोरदार मांडणी करून मागील भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती सरकारने दिलेले आरक्षण किती फसवे होते याचे अनेक सप्रमाण उदाहरणाचा पाढाच मराठा बांधवांनी त्यांच्यासमोर मांडला .तसेच युती सरकारला मराठा समाजाच्या अभ्यासू नेत्यांनी ईसबीसी मराठा आरक्षण कोर्टात टिकणार नाही ते देऊ नका समाजाला आरक्षण द्यायचेच असेल तर ते ओबीसी तच दया असे सांगून सुद्धा दगा झाला , समाजातील आरक्षणासाठी तरुणांनी दिलेले बलिदान वाया गेले , तेच आघाडी सरकारने केले आताही आघाडी सरकार मराठा आरक्षण च्या बाजूने नाही , केंद्राने दिलेले आर्थिक दुर्लबल 10 टक्के आरक्षन जे सर्व जाती धर्मातील लोकांना दिले आहे तेच पुढे करून समाजाची फसवणूक करीत आहेत , सगळ्याच पक्षाच्या मराठा नेत्यांनी मराठा समाजाचा घोर अपमान केला आहे , आता या पुढेही समाजाची फसवणूक करायची असेल तर बंद करा हे राजकारण आशा स्वरूपाचे अनेक प्रश्न सकल मराठा समाजाच्या वतीने मांडून आपल्या तीव्र भावना मांडल्या
जर विदर्भातील कुणबी मराठा हा ओबीसी त असेल तर त्यांचे मराठवाड्यात सोयरे आहेत , मग आमदार श्वेताताई महाले जर ओबीसीत तर मराठवाड्यातील मराठा बांधव ओबीसीत का असू शकत नाहीत , एकदा मराठा आणि कुणबी एक आहेत असं जर खर आहे तर हा मराठवाड्यातील मराठा समाजावर अन्याय का होतोय असे मत उपस्थित मराठा समाजातील मान्यवरांनी मांडला ,
त्याच्यासोबत हिंगोली चे आमदार तान्हाजीराव मुटकुळे , भारतीय जनता पक्षाचे हिंगोली जिल्हा अध्यक्ष ऍड शिवाजीराव जाधव , माजी आमदार रामराव वडकूते , वसमचे माजी नगराध्यक्ष शिवदास बोडडेवार ,तालुका अध्यक्ष खोबराजी नरवाडे , सुनील बागल , सुनील अग्रवाल, उपनगराध्यक्ष सीताराम म्यानेवार , नगरसेवक शिवाजी अडलिंगे , पंचयत समितीचे उपसभापती विजयराव नरवाडे , अक्षय भोसले , देशमुख , इ उपस्थित होते
यावेळी वसमत तालुक्यातील सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्याप्रमाणात उपस्थित होते ,
यावेळी बोलतांना आमदार तान्हाजीराव मुटकुळेम्हणाले की लवकर मराठा समाजाच्या आरक्षण या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारचे एक दिवसाचे विशेष अधिवेशन संपन्न होणार आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे त्यात भारतीय जनता पार्टीचे सर्व आमदार मिळून आपल्या प्रश्नावर नक्कीच बोलतील त्यासाठी पुष्पाताई महल्ले यांचा हा दोरा आहे ,
यावेळी ऍड शिवाजीराव जाधव यांनी आरक्षण या विषयावर महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात कमी पडले आहे असे मत मांडले .
“””””””””””””””””””””””””””””””””””
मी हिंगोली जिल्हा आणि परभणी जिल्हा सकल मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यासाठी आलो आहे यानंतर सभागृहातील व रस्त्यावरील मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी आम्ही समाजासोबत आहे ,नक्कीच तुमच्या भावना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ठेऊन यावर लढा उभारला जाईल -मी एक मराठा म्हणून मी तुमच्या पाठीशी आहे ,गरज पडल्यास सभागृहात हा मुद्दा मी नक्कीच मांडील अशी ग्वाही त्यांनी उपस्थित सकल मराठा समाजास दिली
आमदार श्वेताताई महाले
“””””””””””””””””””””””””””””””””””