वसमतला ढोल बजावो आंदोलन
वसमत
प्रतिनिधी,
म सर्वोच्य न्यायालयाने 9 सप्टेंबर रोजी मराठा आरक्षनाला शिक्षण व शासकीय सेवेत स्थगिती देण्याचा दुर्देवी अन्यायकारक आहे त्याचा फेरविचार करून शासनाने दिलेले मराठा आरक्षण लागू करावे यास स्थगितीचानिर्णय होत नाही तोपर्यंत शासकीय नोकर भरती व सर्व जागा रिक्त ठेवाव्यात , मराठा क्रांती मोर्चातील तरुनावरील दाखल करण्यात आले ले गुन्हे माफ करा, 2019 मध्ये निवड झालेल्या mpsc मधील मराठा उमेदवार यांची निवड संरक्षित करा ,
पावसाने झालेलीअतिवृष्टी शेत, पिकांचे नुकसान त्याची नुकसान भरपाई म्हणून हेकक्ट्री 1 लाख व इतर पिकासाठी 60 हजार रुपये द्यावे
केंद्र सरकारने हस्तक्षेप करु न सुप्रीम कोर्टातील स्थगिती उठवावी नसता पुढील काळात मराठा क्रांती मोर्चा दिल्लीत धडकेल ,सारथी संस्थेच्या अध्यक्ष पदी खा ,छत्रपती संभाजी राजे यांची नियुक्ती करण्यात यावी व सारथीला 1 हजार कोटी रुपये देण्यात यावे, राज्य शासनाच्या आखत्यारित्या सर्व शिक्षण संस्थांमध्ये मराठा समाजाला 12 टक्के जागा वाढवून आर्थिक तरतूद करण्यात यावी, राज्य शासनाने केंद्र शासनाला राज्यघटनेत दुरुस्ती करून 50 टक्यांनी मर्यादा रद्द संपविण्यासाठी विनंती करावी, राज्य सरकारने आरक्षण यावरील स्थगिती उठेपर्यंत वाढीस जागांची तरतूद करून आर्थिक तरतूद करावी, सर्वोच्य न्यायालयात सरकारची बाजू मांडणाऱ्या ज्येष्ठ वकिलांना ब्रिफिंग करण्यासाठी सुचविलेल्या वकिलांची समिती तत्काळ गठीत करण्यात यावी , ज्या योजनांची घोषणा राज्य सरकारने केल्या आहेत त्यांची तत्काळ अमलबजावणी करावी ,मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी ची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारावी ,
वरील मागण्यांचा विचार करून महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार यांनी निर्णय घ्यावा नसता पुढील आठवड्यात मराठा समाज आक्रमक भूमिका घेऊन आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाहीत असे निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयात वसमतच्या सकळ मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले
या ढोल बजाओ अंदोलनात वसमत शहर व तालुक्यातील सर्व पक्षातील समाज बांधव उपस्थित होते .