नवरत्न मालिका
” फातिमा शेख जयंती “
(जन्म 21 सप्टेंबर 1832)
सावित्रीमाईच्या जोडीने स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या फातिमा शेख
फातिमा शेख या पहिल्या मुस्लिम शिक्षिका, ज्यांनी क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या बरोबर 173 वर्षापूर्वी मुलींच्या मध्ये शिक्षणाची ज्योत पेटवली.
प्रतिकूल परस्थितीमध्ये प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात जाऊन शिक्षणाचे महान कार्य करणारे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीमाई फुले यांना साथ देणाऱ्या
‘सावित्रीच्या सोबतिणी’हे खास नाव यासाठी कारण जसं सावित्रीबाई फुलेंनी महिलांना शिक्षणाची दारं उघडी करून दिली तसंच या सगळ्या स्त्रियांनी भारतातल्या महिलांच्या हक्कांसाठी प्रयत्न केले,लढा दिला.
सावित्रीबाई फुलेंच्या खऱ्या अर्थाने सहकारी, सखी आणि सहशिक्षिका असणाऱ्या फातिमा शेख यांची.
आपण ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांच्याविषयी जाणतोच. ज्योतिबांनी वंचितांपर्यंत शिक्षण पोहचवण्याचं काम केलं. ते सामाजिक क्रांतीचे प्रणेते होते. सावित्रीबाई देशातल्या पहिल्या महिला शिक्षक. त्यांना आपण क्रांतिज्योती म्हणतो.
सावित्रीबाई म्हणत असतील की, माझ्या अनुपस्थितीत माझी सहकारी शाळेचं सगळं काम नीटपणे सांभाळेल, काहीही तोशीस पडू देणार नाही, तर ती स्त्रीही कमी नसणार. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा समर्थपणे वाहणारी स्त्री म्हणजे फातिमा शेख.
या क्रांतिकारी प्रथम मुस्लिम शिक्षिकेस लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल तर्फे मानाचा मुजरा
व शाळेतील इयत्ता 8 वी 9 वी व 10 वी तील सर्व विद्यार्थिनीच्या वतीने नवरात्रीची ही मनःपूर्वक सहावी माळ अर्पण