वसमत
शहर प्रतिनिधी
शासनमान्य बोधी ट्री एज्युकेशनल फाउंडेशन व जीवन गौरव सार्वजनिक वाचनालय औरंगाबादच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात येतो या संस्थेचा सहावा वर्धापन दिन 2022 यावर्षी साजरा करण्यात आला.आणि याच वर्धापन दिन कार्यक्रम सोहळ्यात राज्यातील 30 सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या शिक्षकांना जीवन गौरव पुरस्कार
ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार संपूर्ण राज्यात प्रतिष्ठा पुरस्कार म्हणून मानला जातो. या वर्धापन दिन सोहळ्यात शामराव नारायणराव रावले बालरक्षक-माध्यमिक शिक्षक कै. दीनानाथ मंगेशकर माध्यमिक शाळा सातेफळ ता. वसमत जिल्हा हिंगोली यांना यावर्षी चा जीवन गौरव पुरस्कार भव्य-दिव्य कार्यक्रमात या कार्यक्रमाचे उद्घाटक मा. खासदार डॉ.श्री सुनील गायकवाड व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री बाबा भांड प्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक व जीवन गौरव चे प्रधान संपादक श्री रामदास वाघमारे, श्री अरुण सुरडकर, संपादक दैनिक सामपत्र,कर सल्लागार श्री सुनील मगरे ,सौ. मीराताई वाघमारे व इतर मान्यवरांच्या हस्ते मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी सभाग्रह,जालना रोड,औरंगाबाद येथे प्रदान करण्यात आला.
श्यामराव रावले हे मागील 25 वर्षापासून हिंदी विषयाचा अध्यापन करतात तसेच ते बालभारती येथे हिंदी अभ्यास गटाचे सदस्य आहेत व हिंदी विषय पुनर्रचित अभ्यासक्रम प्रशिक्षण कार्याचे राज्य तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केले आहे व मागील वर्षी कोरोना काळामध्ये वसमत शहरातील शाळा बंद होत्या त्याच काळात त्यांनी आसेगाव कॉर्नर येथे पालातील मुलांसाठी शाळा-अभ्यास वर्ग सुरू केला व त्यांनी पाला मध्ये जाऊन पालातील मुलांना शिकविले. ही त्यांची एक सर्वोत्तम कामगिरी होय.
श्यामराव रावले यांना जीवन गौरव पुरस्कार 2021-22 मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य डॉ.जयप्रकाश जी मुंदडा व शाळेचे मुख्याध्यापक विश्वनाथ सारंग व सर्व शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी, मित्र-परिवाराने स्वागत व अभिनंदन केले.