शहर प्रतिनिधी
वसमत येथील योगानंद स्वामी कला महाविद्यालयातील लोकप्रशासन विभाग प्रमुख बाळासाहेब सोनबा भिंगोले यानां लोकप्रशासन विषयासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कडुन संशोधक मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाने नियुक्ती दिली आहे .
त्यांनी ” आदिवासी समाज कल्याण प्रशासनाचा एक : चिकित्सक अभ्यास ” विशेष संदर्भ मराठवाडा विभाग ‘ या विषयावर आपले संशोधन केले असून स्थानिक स्वराज्य संस्था हा त्यांचे विशेष अभ्यासाचे क्षेत्र आहे
विविध नियतकालिकातून, ग्रंथातून अनेक लेख, शोध निबंध प्रकाशित झाले आहे .
तसेच ते आपल्या जीवनात इतरांच्या दुःखात सतत सहभागी होत असतात आतापर्यंत त्यांनी अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणात , अनेकांच्या जीवनात आर्थिक मदत करून महत्वाची समाजसेवा देखील केली आहे
त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष माजी आमदार डाॅ. जयप्रकाशजी मुंदडा सचिव डॉ. गोविंद
इपलवार प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील श्री राजेश मंचेवार डॉ. कमलाकर चव्हाण डॉ. संजय गायकवाड डॉ.संदीप गोरे डाॅ.ज्योतीराम चव्हाण डॉ. झंवर मॅडम डॉ. नाकाडे मॅडम डॉ. काशिनाथ चव्हाण डॉ.बाबुळगावकर डॉ. गजानन साधन डाॅ गौतम कांबळे आदींनी त्यांच्या या यशाबद्दल परिवाराने अभिनंदन केले.