वसमत
शहर प्रतिनिधी
महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासुन इंग्रजी शाळा या आर्थीक संकटात सापडलेल्या असताना शिक्षणमंञी असा एकतर्फी निर्णय कसाकाय घेतात याज आश्चर्य वाटत. मागील महिण्यातच आमच्या संघटनेने ज्या पालकांचा कोवीड काळात रोजगार बुडाला नोकर्या गेल्या उद्योगधंदे बंद पडले अशा पालकांना दिलासा मिळावा म्हणुन व त्यांच्या पाल्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये या उदात्त हेतुने आम्ही या पुर्वीच 25% फी माफीचा निर्णय जाहीर केला होता. परंतु आज मान. शिक्षण मंञी महोदयांनी स्वत:चा तोरा मिरवत जशी काही त्यांना पालकांची खुप काळजी आहे असे भासविण्याचा केविलवाणा निर्णय जाहिर केला .परंतु या निर्णयास महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा) चा कडाडून विरोध आहे. कारण की या निर्णयामुळे ज्या पालकांचे रोजगार शाबुत आहेत ज्यांचे उद्योगधंदे सुरळीत सुरू आहे कारखानदार व सातवा वेतन आयोग घेणारे कर्मचारी ज्यांच्या उत्पन्नावर कुठलाही परिणाम झाला नाही अशा पालकांना फी माफी का द्यायची शेवटी अशा पालकांनी फी भरली तरच गोरगरीब पालकांच्या पाल्यांना न्याय देता येईल अन्यथा त्यांना देखील उर्वरीत 85% फी भरण्याची सक्ती करण्याची पाळी संस्थाचालकांवर येईल. याचा शिक्षण मंञी विचार का केला नाही . करीता याकारणात्सव आज शिक्षणमंञ्यांनी जाहीर केलेला निर्णय इंग्रजी शाळा संस्थाचालक कदापीही मान्य करणार नाही.
असे संजयराव तायडे पाटील
संस्थापक अध्यक्ष – महाराष्ट्र इंग्लिश स्कुल ट्रस्टीज असोसिएशन (मेस्टा ) यांनी कळविले आहे