हिंगोली
विशेष
संभाजी ब्रिगेड महाराष्ट्रच्या वतीने प्रधानमंत्री भारत सरकार यांच्या इंधन दरवाढ, शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करावे व मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य वाढीव बिलाच्या , यासाह इतर मागण्यासाठी हिंगोली येथे संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र च्या वतिने केंद्रातली भारत सरकार व महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार सर्वसामान्य जनतेची आर्थिक कुचंबणा करीत आहेत केंद्र सरकारने प्रचंड लुट केली आहे तर राज्य सरकार वाढीव वीज बिलाचा सर्वसामान्य जनतेचे खिसे कापले आहेत वीज बिलाच्या विरोधात भाजपचे आंदोलन व इंधन दरवाढीच्या विरोधात शिवसेना महाविकास आघाडीचे आंदोलन राजकीय जाहीर आंदोलन आहे. खरंच भाजपात दम असे म्हणता येईल की सारी सर्वसामान्य मध्यमवर्गीय गरीब जनतेचे काहीच देणे-घेणे नाही. वाढीव विज बिल दरवाढ म्हणजे औरंगजेबचा “जिझिया” आहे. तरी मा.प्रधानमंत्री व मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आपण दोघेही जबाबदार घटक आहेत सर्व सामान्य जनतेची दिशाभूल न करता इंधन दरवाढ व वाढीव वीज बिल माघे घेऊन सर्वसामान्य जनतेला दिलासा द्यावा हि नम्र विनंती. अन्यथा संभाजी ब्रिगेड पुढील काळात यापेक्षा तिव्र आंदोलन छेडणार आहे. तरी आज हिंगोली येथे धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष मनोज दादा आखरे यांनी केंद्र सरकार व राज्य सरकार मिलीभगत असुन ते जणतेला फसवण्याचं काम येथील राज्य व केंद्र सरकार करत आहे असे सांगितले मा. जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मा.प्रधान मंत्री व मा.मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आले संभाजी ब्रिगेड च्या वतीने रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. जर केंद्र सरकार व राज्य सरकार ने गांभीर्याने विचार केला पाहिजे अन्यथा संभाजी ब्रिगेड रस्त्यावर सर्व ताकदीनिशी उतरेल व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास संपूर्ण जबाबदारी ही शासनाची असेल व यावेळी संभाजी ब्रिगेड चे अध्यक्ष मनोज दादा आखरे, हिंगोली जिल्हाध्यक्ष सतिष पाटील महागावकर, वसमत तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर माखणे, वसमत तालुकाध्यक्ष विजय ढाडाळे, कळमनुरी तालुका अध्यक्ष राम पुंड, वसमत विधानसभा अध्यक्ष आलोक इंगोले, जिल्हा सचिव नारायण खराटे, जिल्हा प्रसिध्दी प्रमुख नितिन भोसले, शहराध्यक्ष महेश राखोंडे, ता. अध्यक्ष शिवराज सरनाईक, नामदेव कदम, कृष्णा जाधव,राजू जाधव, संदिप पतंगे,विश्वंभर सुर्यवंशी,संपत पतंगे, गजानन घाटफोडे, गजानन हाके, विश्वजित घोडगे, महेश राखोंडे, गजानन फुलझळके, मारोती दळवी, लखन कदम, मल्लिकार्जुन फुलझळके, विशाल कुटे,बालाजी कुटे, आकाश खराटे,प्रशांत भोसले, गंगाप्रसाद साखरे, गंगाधर चेपुरवार, राजकुमार कापसे, गोविंद, विकास नाना भोसले,तोलाजी ,सटवाजी नरवाडे, अर्जून गोटे,शेख शाबेर, मारूती क-हाळे, अंकुश व्यवहारे,श्रिनिवास व्यवहारे,डिगांबर व्यवहारे,प्रसाद व्यवहारे,व असंख्य शेतकरी कामगार व संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हिंगोली येथे उपस्थित होते
हिंगोली येथे संभाजी ब्रिगेडचे धरणे आंदोलनाने जिल्हाधिकार्यालय गेले दणानुन
Leave a comment