हिंगोली,
विशेष
वसमत तालुक्यातील सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणून ओळख पात्र असलेले
आणि राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण गाव आसलेले कुरुंदा हे गावं सर्व परिचित आहे, गावात प्रत्येक पक्षाची आणि सर्वच धर्माची लोक गुण्या गोविंदाने नांदतात , येथील जनता धर्मनिरपेक्ष असल्याने येथे कोणत्याच प्रकारचा कोणासोबत भेदभाव केला जात नाही याचे उदाहरण अनेक वेळेस आपल्याला पाहावयास मिळाले आहे ,
याचाच एक भाग म्हणून
कुरुंदा या गावी मागील चार वर्षापासून शिवाजी महाराज डोक्यावर न घेता डोक्यात घेऊन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव अतिशय शांत वातावरणात सर्व जाती-धर्मांच्या नागरिकांना सोबत घेऊन साजरी केली जात असते,
शिवजयंतीच्या रॅलीच्या माध्यमातून समाजप्रबोधन कार्यक्रमाच्या माध्यमातून शिवाजी महाराज यांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचे कार्य करण्यात येत असते, त्याच दृष्टिकोनातून यावर्षी कुरुंदा येथील प्रतिष्ठित व्यापारी शेख आसद शेख नूर यांची शिवजयंतीच्या अध्यक्षपदी तर सुरेश इंगोले , संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष वसमत , यांची उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ,
याही वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकण्याचेकार्य शिवजयंती समितीतर्फे करण्यात येणार आहे ,
त्यादृष्टीने यावर्षीही 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंती अतिशय उत्साहात साजरी करण्यात येणार आहे , शिवजयंती निमित्ताने शाळेमध्ये निबंध स्पर्धा , वेशभूषा स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी कार्य शिवजयंतीच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे वक्तव्य शिवजयंती चे अध्यक्ष शेख अासद आणि उपाध्यक्ष सुरेश इंगोले यांनी यांनी कळविले आहे,
कुरुंदा गावच्या सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समितीच्या अध्यक्षपदी शेख आसद नूर तर उपाध्यक्षपदी सुरेश इंगोले यांची निवड
Leave a comment