हिंगोली येथे पत्रकार परिषद संपन्न
प्रतिनिधी,
महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्था चालक संघटना (मेस्टा) ने मराठवाडा पदवीधर निवडणूक लढवायचा निर्णय घेतला आहे.मराठवाड्यातील पदवीधर, सुशिक्षित बेरोजगार, डॉक्टर, वकील, इंजिनिअर शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, हे सर्व गतकाळातील आमचेच विद्यार्थी आहेत. यांना कोणीच वाली उरला नाही यांच्या वरील अन्याला वाचा फोडण्यासाठी व मराठवाड्यातील विद्यार्थी पालक तसेच 5000 इंग्रजी मराठी उर्दू शाळांच्या माध्यमातून विनाअनुदानित शिक्षक व बी एड संघटना यांनी अथक परिश्रम घेऊन मिळून गेल्या वर्षभरात (70000) सत्तर हजार पदवीधर मतदार नोंदणी केली या बळावर. सर्व क्षेत्रातील संघटना. सोबत घेऊन ही निवडणूक लढत आहोत.
आपल्या कार्यकाळात ज्यांच्या मतांवर आपण निवडून आलो. त्यांच्या अडीअडचणी बद्दल गेल्या बारा वर्षात एक अवाक्षर बोलले नाही किंवा एकही समस्या सोडवल्याचे ऐकिवात देखील नाही. शिक्षण खात्यातील भोंगळ कारभार तर मागील सरकार च्या काळातील असो की या सरकारच्या काळातील असो आपल्या सर्वांनाच माहिती आहे. या क्षेत्रात तर गेल्या अनेक वर्षांपासून संघटना सर्व स्तरातील घटकांना न्याय मिळवून देण्याचं कामं करत आली मग आर्थिक दुर्बल घटकातील गरीब विद्यार्थी यांना मध्यांन्ह भोजन असो की त्यांचे गणवेश दप्तराची मागणी असो
कोविड 19 महामारीच्या काळात सर्वच विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित राहावं लागलं. अनेकांचे रोजगार थांबले, नोकऱ्या गेल्या. उद्योग धंदे बंद पडले, अनेकांचे संसार उध्वस्त झाले, मायबाप सरकार तर सोडाच परंतु हे आमचे मराठवाड्याचे नेते कुठेच दिसलें नाही. सरकाने कोणतीही शैक्षणिक सुविधा न पुरवतात ऑनलाईन शिक्षणाच्या पोकळ गप्पा मारल्या एकही अनुदानित किंवा सरकारी शाळेतील विद्यार्थी या वर्षी शिकेलाच नाही. विनाअनुदानित इंग्रजी मराठी उर्दू शाळेंतील शिक्षकांचे संसार उघड्यावर आले. त्यांच्या कुटुंबांची अक्षरशः उपासमार झाली. काही शिक्षकांनी जगण्यासाठी भाजीपाला विकला, वडापाव च्या गाड्या लावल्या, हातगाड्यावर सानिटायझर विकले, तर काही मी चिप्स बनवले काहींनी खेळणे विकण्याचा धंदा केला कोळी रंगकाम केले कुणी धान्य विक्री केली पेंटिंग करून आपल्या संसाराचा गाडा ओढण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. अनेकांचे हकनाक बळी गेले सरकार कडून साधी मदतीची मागणी ना पदवीधर आमदाराने केली ना शिक्षक आमदाराने केली की ज्यांना निवडणूक लढवायची त्या इच्छुकांनी केली. या सर्वांनी आमची साथ सोडली. सर्व शिक्षण क्षेत्र त्राहिमाम् असताना मी मूग गिळून गप्प बसले. उद्या येणाऱ्या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी कशी करून घ्यावी याचा अभ्यास हे आमदारांना नाहीत. म्हणून पदवीधरांचा आमदार हा पदवीधर असला पाहिजे कोणी ठेकेदार नाही.
शिक्षकांचे हाल सुरू आहेत वकिलांच्या अनेक समस्या आहेत डॉक्टर सुरक्षित नाहीत. त्यांना रोज या ना त्या कारणाने मारहाण केली जाते. इंजिनीयर बेकार फिरताय. बीएड पदवीधर बेकार फिरत आहेत. औरंगाबाद सारखे औद्योगिक क्षेत्रात 400 कारखाने असून मराठवाड्यातील एकही पदवीधर तिथे नोकरीला नाही. मराठवाड्यातील तरुणांना 35-35 वर्षे वय झाले तरी त्यांची नोकरी नाही म्हणून लग्न जुळत नाहीत. असे अनेक ज्वलंत प्रश्न मराठवाड्यात असतांना यासंदर्भात गेल्या बारा वर्षापासून विधान परिषदेमध्ये तरीदेखील या आमदारांनी एक शब्द देखील काढला नाही. कधी कुणाच्या शाळेवर, एखाद्या कोर्टात किंवा दवाखान्यात जाऊन या त्रासलेल्या शिक्षकाची वकिलाची व डॉक्टरांची साधी विचार पूस केली नाही. मराठवाड्यातील मूळ प्रश्नांना फाट्यावर मारत फक्त पदवीधरांची मत लाटत हजारो कोटीची माया यांनी जमा केली. कोणी अडचण मांडयला गेलाच तर त्याला दादागिरी ही भाषा वापरत गप्प केले गेले. म्हणून आता बस्स झालं भूतकाळात आम्ही ज्यांना डॉक्टर वकील इंजिनिअर शिक्षक बनवलं त्या आमच्या माजी विद्यार्थ्यांचे हाल आता पहावत नाही. आणि म्हणूनच मेस्टा आता सर्वपक्षीय कार्यकर्त्यांना व सर्व सामाजिक संघटनांच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक सर्व दिशेने ताकदीनिशी लाढवणार आहे. मेस्टा कडे मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातून वेगवेगळ्या सामाजिक संघटनांच्या व वेगवेगळ्या स्तरातील नेत्यांनी उमेदवारी मागितली आहे. येत्या आठ दिवसात त्यांच्या मुलाखती घेऊन यादी जाहीर केली जाईल.असे संजयराव तायडे पाटील
संस्थापक अध्यक्ष मेस्टा यांनीसांगितले आहे यावेळी पदवीधर निवडणूक लढविणारे इच्छुक असलेले उमेदवार दिलीपराव घुगे , संघटनेचे पदाधिकारी प्रेम गावंडे , गजानन लोमटे , नामदेव दळवी शिवक्रांती संघटनेचे राज्यअध्यक्ष संजय सावंत ,श्री सावंत ,यादव
पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते