लिटल किंग्जच्या जिजाऊ-सावित्री क्रीडा महोत्सवाचे उदघाटन
वसमत
शहर प्रतिनिधी
आपल्या देशात सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला त्यांनी केलेल्या कार्यामुळे आजच्या देशातील महिला स्वाभिमानाने आपले जीवन जगत आहेत , कदाचित सावित्रीबाई फुले जन्माला आल्याच नसत्या तर या देशातील स्त्रियानी गुलाम म्हणून आपले जीवन जगले असते ,दुर्देवाने सावित्रीच्या देशात आजच्या अनेक सावित्रीना आपल्या जिवाला मुकावे लागत आहे , हा आपल्या व्यवस्थेचा पराभव मानावा की काय ? कारण स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही या देशातील मुलगी स्वतंत्रपणे आपला विचार करू शकत नाही तिच्या जिवाच्या आकांताने अनेक मुलींना जीव मुठीत धरून जगावे लागत आहे , इथली व्यवस्था अजूनही स्त्रियांना स्वातंत्र्य देणार नाही का अनौपचारिक शिक्षणाची केंद्रे का बंद पडली राष्ट्रमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या कालखंडात सावित्री जिजाऊंच्या लेकरांना सकस नैसर्गिक खाद्य खायला मिळत होते ,आज आपण एवढी प्रगती करू नही आजच्या विद्यार्थ्यांना दुर्दैवाने आजच्या सावित्री-जिजाऊ सकस खायला देत नाही म्हणूनच तर आजचा विद्यार्थी रांगडा आणि तेजदार तरुण निर्माण झालेला आपल्याला पाहायला मिळत नाही असे परखड मत वसमत च्या पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी तानाजी राव भोसले यांनी व्यक्त केले ते वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल च्या वार्षिक जिजाऊ-सावित्री क्रीडा महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते ,
यावेळी केंद्रप्रमुख साहेबराव कदम, केंद्रप्रमुख रामराव वराड शाळेचे संस्थापक प्रा नामदेव दळवी, मुख्याध्यापक गोविंद दळवी, क्रीडा विभाग प्रमुख संजय उबारे, हे उपस्थित होते,
यावेळी केंद्रप्रमुख साहेबराव कदम यांनी माझी मायच माझी सावित्री झाली झाली म्हणून मी माझे शिक्षण घेऊ शकलो असे मत व्यक्त केले, तर वरा ड सर यांनीही आपले विचार मांडले,
पुढे बोलताना गटशिक्षणाधिकारी म्हणाले की,सावित्रीबाई फुले यांच्या शिक्षणाचा वसा घेऊन आजच्या शिक्षकांनी मुलांना नितीमुल्याहीत, आरोग्य ,शिक्षक, व शारीरिक शिक्षण या कामात कुठेही कमी पडू नये, मुलांना हे सांगावे की विमानात बसायचे असेल तर पुस्तके वाचावे कारण विमानाचा मार्गच पुस्तकातून जातो हे सावित्रीबाई फुले यांनी सांगितले आहे, जगी सुखी होण्यासाठी शिक्षणच महत्वाचे आहे,म्हणून चांगले संस्कारक्षम शिक्षण ही आजच्या शिक्षकांची जबाबदारी आहे,
लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल मध्ये 3 जानेवारी ते 12 जानेवारी, 2020 पर्यंत शाळेत विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धा संपन्न होणार आहेत 12 जानेवारीला जिजाऊ जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धचा समारोप व बक्षीस वितरण करण्यात येणार आहे,
कार्यक्रमाचे सूत्र संचालन शिक्षक सइम पिराजी यांनी केले,