वसमत
शहर प्रतिनिधी,
वसमत तालुक्यातील पूर्णा सहकारी साखर कारखाना आणि टोकाई सहकारी साखर कारखाना व खाजगी गूळ कारखान्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे रोडवरील वाहतूक कधीही धोक्यात येऊ शकते, कारण या अवजड ऊस वाहतूक करणारे ट्रॅकटर मालक एका एका ट्रॅकटरला दोन दोन ट्रॉल्या लावून धोकादायक पद्धतीने ऊस वाहतूक करताना आढळून येत आहेत, त्यामुळेरस्त्यावरून जाणारे शालेय, विध्यार्थी प्रवाशी यांना जीव धोक्यात घालून वाहने चालवावी लावत आहेत,
ना या वाहनावर वाहतुक पोलिसांचा वचक राहिला आहे ना आरटीओ कार्यालयाचा, यामुळे रस्त्यावर ही वाहने कधीही पलटी होऊन मोठा अपघात होऊ शकतो,
या ट्रॅकटर वाहनवरील ड्रायव्हरजवळ मोठमोठाली साउंड सिस्टीम त्यांनी लावल्यामुळे आणि त्या गाण्यांच्या आवाजामुळे त्यांना मागील वाहनाने दिलेल्या हॉर्नचाही आवाज ऐकू येत नाही , त्यामुळे इतर वाहनांना ही मंडळी रस्ताही सोडत नाही ,
विशेष बाब म्हणजे ही सर्व ऊस वाहतूक करणारी वाहने रात्रीही वाहतूक करीत असतात , त्यामुळे या वाहनावर रेडियम रिप्लेकटर लावणे गरजेचे असताना, वाहनावर मागील बाजूस रिप्लेकटरही बसविण्यात आलेले नाहीत त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ही वाहने रस्त्यावरून वाहतूक करताना धोका निर्माण होऊ शकतो,
म्हणून संबंधित यंत्रणेने वेळीच लक्ष देणे गरजेचे बनले
नुकतेच नांदेड जिल्ह्यातील वाहनावर पोलिसांनी कार्यवाही केली आहे ,गाण्याबद्दल वाहन मालकांना तशा सूचनाही देण्यात आल्या आहेत, पण वसमत तालुक्यातील ऊस वाहतूक करणाऱ्या या वाहनचालकांना शिस्त लावने गरजेचे असल्याचे बोलले जात आहे ,