जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांचे आव्हान
हिंगोली विशेष
प्रतिनिधी
प्रस्तापीत राजकिय नेते व संबधीत विभागाच्या प्रशासनानी संभाजी ब्रिगेडच्या खालील प्रश्नाची उत्तरे द्यावीत – सतिश पाटील महागावकर
समाजामध्ये लोकांच्या प्रचंड समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी कोणी प्रयत्न करत असेल तर प्रोत्साहन द्या,खच्चीकरण करून तुमच्यासारखी चमकोगिरी करण्यास भाग पडू नका।।
१)खेडेगावातील गावठाण व शेतातील वीज रोहित्र प्रश्न.
२) महाराष्ट्र विज वितरण कंपनीच्या कुचकामी यंत्रणेमुळे खेडेगावांमध्ये वीज ही टिकत नाही,प्रत्येक वेळेला विजेचा लपंडाव चालू असतो ही एक मोठी समस्या.
३) गुरांवर आत्ता चालू झालेल्या साथीच्या आजारांवर कुठल्याही प्रकारचे औषध उपचार व मार्गदर्शन शिबिर महाराष्ट्र शासनाच्या पशुवैद्यकीय अधिकारी कर्मचाऱ्यांकडून होत नाही याचा अर्थ पशुवैद्यकीय खात्यातील कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना फुकटचा पगार केला जातो,एकाही खेडेगावात यांची भेट नाही यावर तुमची वचक आहे का?
४) आता फिरत आहेत असा तालुक्यातील खेडे वस्त्या तांडे यांचे सर्वेक्षण करून मुख्य रस्त्यांची पाहणी करा व कुठे पक्के रस्ते करण्याची आवश्यकता आहे याची नोंद घ्या कारण जिल्ह्यात अनेक गावांना रस्तेच नाहीत.
५) पुरवठा विभागामध्ये पुढाऱ्यांच्या व नेत्यांच्या संगणमतातूनच अत्यंत मोठे व छोटे भ्रष्टाचार होतात परंतु सामान्य लोकांना अद्यापपर्यंत रेशन कार्ड मिळालेले नाही त्यावर आपण काही उपाययोजना करणार आहात का?
६) प्रशासकीय यंत्रणेतील तलाठी,मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक,ग्रामसेवक ह्या लोकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात असलेल्या खेडेगावांमध्ये जाऊन शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे बंधनकारक असते व सामान्य व्यक्तींची कामे करणे ही त्यांची जबाबदारी असते परंतु जिल्ह्यामध्ये कुठल्याही गावांमध्ये प्रशासकीय यंत्रणेतील हे अधिकारी कर्मचारी कधीच जात नाहीत व लोकांना कधीही सहकार्याच्या भावनेतून मदत करत नाहीत यावर आपण वचक ठेवणार का?
७) रॅपिड एंटीजन टेस्टमध्ये किंवा स्वबमध्ये कोरोना पॉझिटिव आलेल्या रुग्णांसाठी कोरेनटाईन सेंटरमध्ये कुठल्याही प्रकारची यंत्रणा नाही कुठल्याही प्रकारचा औषध उपचार नाही फक्त विलगीकरण ठेवून दोन वेळेस निकृष्ट जेवण दिलं जातं याविषयी आपलं म्हणणं काय?
ह्याची जर नेत्यांकडे किंवा सन्माननीय आमदार, खासदार यांच्याकडे उत्तरे असतील तर आपण नक्कीच ह्यांची उत्तरे द्यावीत, आपल्या उत्तराच्या प्रतीक्षेत।।।।
आपलाच: सतीश पाटील महागावकर,
जिल्हाध्यक्ष ,संभाजी ब्रिगेड,हिंगोली.
संपर्क:8007111499,
:7770007377.