वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश शाळेचा अभिनव उपक्रम
वसमत
प्रतिनीधी
कोरानाच्या काळात आपण प्रचंड अस्वस्थ झालो आहोत. मागील काळात झालेल्या चुका आणि मोठ्या प्रमाणात होत चाललेली निसर्गाची हानी, यामुळे आपण पुढील काळा विषयी चिंताग्रस्त आहोत. या परिस्थितीतून काहीतरी मार्ग निघावा यावर आपण विचार करत आहोत. काहीतरी कृती करून येणाऱ्या काळाला सामोरे जाण्याचा आपला विचार आहे. आणि हो, हे पर्यावरण संतुलन राखले गेलेच पाहिजे तरच आपल्याला मोकळा श्वास मिळेल. आपण, आपले कुटुंब, आपला परिसर, आपला देश मुक्त श्वास घेईल.
म्हणूनच मागील वर्षी शाळेने प्रा नामदेव दळवी यांच्या संकल्पनेतून शाळेत झाडाचा गणपती बसविला होता ,
त्याची दखल इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया ने सुद्धा घेतली ,
त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीसाठी जनजागृती सुद्धा झाली
या वर्षी शाळा सध्या बंद आहेत
लवकरच गणेशोत्सव सुरू होणार आहे .
त्यामुळे या वर्षी पर्यावरण विषयक जनजागृती व्हावी म्हूनून शालेतील सर्व मुलांनी आपापल्या घरीझाडाचा गणपती बसवायचा आहे
त्यामुळे शाळेने
‘ झाडाचा गणपती ‘ ही अभिनव संकल्पना सुरू केली आहे.
या वर्षी तर कोरानामुळे आपण सार्वजनिक गणपती बसू शकणार नाही आहोत . घरगुती गणपतीच बसून उत्सव साजरा करणार आहोत.
चला थोडा विचार करू या. झाडाचा गणपती बसवू या. यातून उत्सवही साजरा होईल आणि निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी एक पाऊलही पुढे पडेल.
आपल्याला काय करायचे आहे.
आपण आपल्या घरीच गणपती मांडायचा आहे..
🎴गणपती काळ्या मातीचा किंवा शाडूच्या मातीचा लहानात लहान गणपती मांडायचा आहे.
🎴गणपतीच्या चारी बाजुला चार आणि पाठीमागे एक अशी वेगवेगळ्या प्रकारची फळझाडाचे रोपे ठेवायची आहेत. एकूण पाच किंवा आपण ठेवू शकाल तेव्हढी.
🎴 समोर आपण जेव्हढी ठेवू शकाल तेव्हढी फळझाडे ढेवायची आहेत. किंवा फक्त पाच ठेवली तरी चालतील.
🎴 फळझाडाची रोपे नसतील तर पन्यात माती भरून दीर्घकाळ टिकणा-या फळझाडाच्या बिया लावाव्यात.
🎴 गणपती विसर्जनाच्या दिवशी ही फळझाडाची रोपे आपल्या शेतात, गावातील रिकाम्या जागेत, देवस्थानाच्या रिकाम्या जागेवर किंवा जागा भेटेल तेथे लावायची आहेत.
🎴 पुढील गणपती पर्यंत या रोपांचे संगोपन करायाचे आहे
🎴 झाडांमधे दीर्घकाळ टिकणारी आंबा, चिंच, जांभुळ, फणस, रामफळ, सिताफळ, कवठ, बिब्बा, बेल, चिकू, नारळ, उंबर, वड, पिंपळ, लिंब इ. असावीत.
झाडाचा गणपती मांडल्याने काय होईल
🌳 फळझाडांची रोपे लागतील.
🌳 फळझाडांमुळे शेतकरी बांधवांना आर्थिक उत्पन्न मिळेल.
🌳 पर्यावरणाचे संतुलन निर्माण होण्यास मदत होईल.
🌳 मातीचे गणपती तयार झाल्यामुळे प्रदूषण थांबेल.
🌳 समुहाने एकत्र न येता, घरातच उत्सव साजरा होऊन, कोरोनावर मात होईल.
🌳 अनावश्यक खर्च टळेल.
🌳 आणि खराखुरा चालत आलेला पाना, फुला, फळांचा,झाडांचा, मातीचा नैसर्गिक गणपती बसेल.
🌳 आपल्या सर्वांच्या कृतितून दुष्काळनिवारणासाठी एक पाऊल पुढे पडेल.
आणि यातून आपल्याला काही उत्तरे मिळणार आहेत .
🍏 का मांडत असतील गणपती मातीचा ?
🍏 का वाह्यल्या जात असतील फुले ?
🍏 का समोर ठेवत असतील फळे ?
🍏 का वाहात असतील आघाडा, केणा ?
🍏 का बांधल्या जात असतील खांब केळीचे ?
🍏 का मातीचे ढिगारं उभे करून टाकल्या जातो गहू ?
🍏 का वाहात असतील दूरवा हराळी ?
🍏 का निसर्गाचे काही संदर्भ असतील यात ?
फळे, फुले, पाने, झाड, मातीची तर पूजा नसेल. निसर्गाने दिलेल्या या उत्पादक घटकांचे महत्त्व समजून घेण्याचा हा उत्सव असेल कदाचित !
🌳 म्हणूनच चला झाड, माती, पाना-फुलांना समजून घेऊ. झाडाचा गणपती बसवू. गणपतीलाच झाडात पाहू.
म्हणून विद्यार्थी मित्रानो या वर्षी आपण
घरोघर झाडाचा गणपती बसवून हा उत्सव घरीच साजरा करू. आपल्या जवळच्या मित्रांना झाडाचा गणपती बसवायला लावू. कोरोना सारखे प्रसंग येऊ द्यायचे नाहीत आपल्याला असे वाटत असेल तर निसर्ग फुलवावा लागेल. प्रत्यक्ष कृतिला लागावे लागेल. लहान मोठ्यांना समजावून सांगावे लागेल. आपल्या आळीत, गावात, शहरात गट तयार करून आपण लढू शकतो या विषारी विषाणूशी. फक्त सुरूवात स्वतःपासून करणे गरजेचे आहे.
🌱 तुम्हाला शाळेतून काय मिळणार
वसमत तालुक्यातुन प्रथम द्वितीय, तृतीय आणि उतेजनार्थ दोन आशा विद्यार्थ्यांना मिळणार भरघोस बक्षिसे
सोबत सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व गोल्ड मेडल आणि शालेय वस्तूसुद्धा
आणि हिंगोली जिल्ह्यातून प्रथम द्वितीय, तृतीय आणि उतेजनार्थ दोन आशा विद्यार्थ्यांना मिळणार भरघोस बक्षिसे
सोबत सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व गोल्ड मेडल आणि शालेय वस्तूसुद्धा
तुम्ही मांडलेल्या झाडाच्या गणपतीचे 2 सुंदर फोटो खालील मोबाइल नंबरवर वॉट्सप करावेत
8698367054 अंभोरे सर
9970421003 गावंडे सर
यातून परीक्षक आपले बक्षिसे काढतील