वसमत
प्रतिनिधी,
वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल ने आयोजित केलेल्या शिवराय मनामनात शिवजयंती घराघरात या अभिनंव उपक्रमाचे आयोजन केले होते ,खास विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार आणि कार्याची माहिती व्हावी त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना ज्ञात व्हावा, सध्या महाराष्ट्रात शिवजयंती चे बिघडलेले स्वरूप व त्यातून तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार डोक्यात घेण्याऐवजी ते डीजेच्या तालावर नाचताना दिसतात म्हणून लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल च्या मुलांना त्यांचे चरित्र समजण्यासाठी शाळेतील प्रत्येक मुलांनी घरी महाराजांच्या जयंती दिनी दि १९ फेब्रुवारी २०२० रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेऊन सहकुटुंब जयंती साजरी करावी त्यांचे चरित्र वाचावे ही अभिनव स्पर्धा आयोजित केली होती
प्राथमिक व माध्यमिक या दोन गटातून ही स्पर्धा संपन्न झाली
यात प्राथमिक गटातून शाळेतील विध्यार्थी तेजस गजानन भोपे यांनी प्रथम क्रमांक सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख १००० रु पटकावले तर द्वितीय क्रमांक सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व रोख ७०१ रुपये विभागून महाजन समर्थ नारायण व जगताप आयुष चंद्रकांत यांनी मिळविला तर तृतीय क्रमांकाचे रू ५०१ सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र कु कु प्राची कोटे या विध्यार्थीनीने मिळविला
तर माध्यमिक गटातून प्रथम क्रमांक कु श्रुती चंदकांत जाधव, द्वितीय क्रमांक अभिषेक पांचाळ तर तृतीय क्रमांक हर्षवर्धन विकास सवंडकर या विद्यार्थ्यांनी मिळविला आहे
या विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल शाळेच्या विशेष पालक सभेत त्यांचा गौरव करण्यात आला आहे