राष्ट्रीय अध्यक्ष प्रा डॉ नामदेव दळवी
नवी दिल्ली
विशेष प्रतिनिधी,
26 नोव्हेंबर रोजी शिक्षक विरोधी, कामगार , कर्मचारी विरोधी, शेतकरी विरोधी धोरणे हाणून पाडण्यासाठी देशातील बलाढ्य 12 कामगार संघटना वतीने, जाहीर झालेल्या देशव्यापी संपात राष्ट्रीय स्तरावर कार्यरत डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषदेने देशातील सर्व राज्यातील शाखांना संपात सहभागी होण्याचे आवाहन परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ नामदेवराव दळवी यांनी केले आहे.
अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी महासंघाचे वतीने व सरकारी — निमसरकारी कर्मचारी व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीच्या आदेशान्वये शासनाच्या कर्मचारी विरोधी धोरणाचा पाडाव व्हावा म्हणून राज्यात सातत्याने कर्मचाऱ्यांनी आंदोलन करून निषेध व्यक्त केला आहे.
डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद या एक दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होणार आहेत.
प्रमुख मागण्या
1) सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा.
2) 100 टक्के अनुदान द्या.
3) व्हॅक्सिन आल्याशिवाय शाळा, महाविद्यालये सुरू करू नका.
4) कोविड पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी थर्मल स्कॅनर, सॅनिटायझेशन इ. सुविधांसाठी संस्थाना किमान 25 हजार आणि कमाल 1 लाख रुपयांचा निधी द्या.
5) शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची रिक्त पदे त्वरीत भरा.
6) सातव्या वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजना लागू करा.
7) बक्षी समितीचा खंड 2 तातडीने प्रसिद्ध करा.
8) अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन त्यांच्या जिल्ह्यातच करा.
9) विषयांना शिक्षक नाकारणारा 28 ऑगस्ट 2015, कला क्रीडा शिक्षकांना हद्दपार करणारा 7 ऑक्टोबर 2015 आणि रात्रशाळा संकटात टाकणारा 17 मे 2017 चा शालेय शिक्षण विभागाचा शासन निर्णय मागे घ्या
10) वस्तीशाळा शिक्षक आणि अप्रशिक्षित शिक्षण सेवक यांची मूळ नियुक्ती दिनांकापासूनची सेवा वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी ग्राह्य धरा.
11) 20 पटाच्या आतील शाळा बंद करु नका.
12) सहाय्यक शिक्षक परिविक्षाधिन यांना वेतन श्रेणी लागू करा आणि परिविक्षाधिन कालावधी कमी करा.
13) अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तासिका तत्त्वावर काम करणारे सर्वच शिक्षकांना सातवा वेतन आयोग तातडीने लागू करा.
14) संस्थांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनेतर अनुदान सुरु करा.
15) वरिष्ठ व निवडश्रेणी विनाअट लागू करा.
16) आयटी विषय शिक्षकांना वेतन मंजूर करा.
17) सावित्रीबाई फुले – फातिमा शेख शिक्षक कुटुंब कॅशलेस आरोग्य योजना लागू करा.
18) शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नका.
19) केंद्राप्रमाणे महिला कर्मचाऱ्यांना दोन वर्ष बालसंगोपन रजा द्या.
20) खाजगीकरण आणि कंत्राटीकरण रद्द करा.
दि. 26 नोव्हेंबर 2020 रोजीच्या लाक्षणिक संपात राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या पुढाकाराने सरकारी कर्मचारी, आयटक,सिटु,इटंक, बँक युनायटेड फोरम, केंद्रीय कर्मचारी,जिल्हा परिषद, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी, बालवाडी,प्राथमिक,माध्यमिक, कनिष्ठ ,व,वरिष्ठ महाविद्यालय शिक्षक,प्राध्यपक, शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालयीन शिक्षकांची एमफुक्टो, बुक्टो संघटना आणि महामंडळांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी होणारं आहेत.
दिं. 26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या लाक्षणिक संपाबाबत माहिती देणार आहेत. एक दिवसाचा लाक्षणिक संप यशस्वी करण्यासाठी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी जोरदार तयारी करावी.असे आवाहन डॉ . नामदेवराव दळवी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ पंजाबराव देशमुख शिक्षक परिषद यांनी केले आहे .