वसमत
शहर प्रतिनिधी
सगळं जग हे कोरोणाच्या सावटाखाली आहे.
या मारामारीत बऱ्याच जणांचे.
घर व व्यवसाय उध्वस्त झालेले असून.
एवढेच नाही तर जनसामान्यांना सुद्धा याचा फटका बर्यापैकी बसलेला आहे.
ही गोष्ट लक्षात घेता
दिनांक 23_06_2021 बुधवार रोजी महागाव येथे.
आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कार्यालय संयुक्त विद्यमानाने.
कोरोणा प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात आली.
यावेळी असंख्य नागरिकांनी लस घेऊन ग्रामपंचायतला व.
तसेच आरोग्य विभागाला योग्य तो प्रतिसाद दिला.
यावेळी आरोग्य विभागाचे डॉ. दीपक खराटे, श्रीमती अरुणा गायकवाड, श्री पद्माकर बोद्दावार, श्री घनश्याम सरोदे, किशन कदम,वैभव लांडगे, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक दरबेसवार, श्री कोंठुळे सर उपस्थित होते,तसेच हा कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडण्यासाठी
ग्रामपंचायत कर्मचारी,उपसरपंच तथा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांनी प्रयत्न केले.यावेळी नागरिकांनी कोरोना नियम पाळत लसीकरण मोहिमेस उदंड प्रतिसाद दिला.यावेळी गावात एकूण 285 नागरिकांनी लसीकरण करून घेतले.यानंतरही आरोग्य विभागाच्या मदतीने लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची दुसरी मोहीम गावात राबवणार असल्याचे सतीश पाटील महागावकर यांनी सांगितले.