वसमत
प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्ताने वसमत तालुक्यातील दाभडी या गावामध्ये आज दि २५ फेब्रुवारी २०२० रोज मंगळवारी सायंकाळी ठिक ७ वाजता महाराष्ट्र भर आपल्या प्रभावी व ओजस्वी भाषणाने प्रसिद्ध असलेली आणि मराठा क्रांती मोर्चा त जिने अत्यंत अभ्यास पूर्ण अशी भाषणं दिली अशी अत्यंत बालवयात हजारोंच्या नव्हे तर लाखो शिवप्रेमींनी लोकांसमोर संबोधित करणारी परभणी येथिल बालव्याख्याती कु गायत्री निलकंठे हिचे व्याख्यान संपन्न होणार आहे
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दाभडी गावच्या प्रथम नागरिक शिवमती सपनाताई भगवान दळवी , शारदा धनंजय दळवी , डॉ, संगिता शिंदे , आशा वर्कर संगीता बालाजी दळवी , बालवाडी ताई शिवानंदा प्रकाश मगरे , डॉ संजय गीते , शिक्षक समिती अध्यक्ष गजानन दळवी, गावचे चेअरमन व्यंकटराव दळवी
यांची विशेष उपस्थित राहणार आहे
तरी परिसरातील व गावातील शिवप्रेमींनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती दाभडी यांनी कळविले आहे
आज दाभडी येथे कु गायत्री निलकंठे हिचे शिवचरित्रावर व्याख्यान
Leave a comment