दहा दिवस दप्तर मुक्त शाळा असल्याने विद्यार्थ्यांनी खेळाचा मनसोक्तं आनंद घेतला .
वसमत .
प्रतिनिधी,
वसमत शहरातील लिटल किंग्स इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती ते 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दरम्यान क्रीडा महोत्सव आयोजित करण्यात येत असतो.
यावर्षी दिनांक 3 जानेवारी 2022 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन वसमत शहरातील ख्यातनाम माजी वैद्यकीय अधिकारी डॉ मारुती
क्यातमवार साहेब यांच्या हस्ते क्रिडा महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. त्यांच्या हस्ते बॉलबॅडमिंटन स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.
या दहा दिवसीय क्रिडा महोत्सवात विविध प्रकारच्या क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या. ज्यात, १०० मीटर धावने , संगीत स्टेशन, संगीत खुर्ची, लांब उडी, उंच उडी, क्रिकेट, १०० मीटर धावणे, रस्सीखेच, सायकलिंग, थाळी फेक, गोळा फेक, खो खो, रेले रेस, आनंद नगरी, पोत्यातील उडया इत्यादी क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या.
दि. 12 जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण शाळेतील पालक प्रतिनिधी , मुख्याध्यापक , शिक्षक यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
सर्व क्रीडा प्रकारातून प्रत्येक वर्गातून प्रथम ,द्वितीय ,तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र सुवर्णपदक शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
क्रिडा महोत्सवा दरम्यान दप्तर मुक्त शाळा असल्याने विद्यार्थ्यांनी खेळाचा मनसोक्त आनंद घेतला.
या दहा दिवसीय क्रिडा महोत्सवात शाळेतील क्रिडा शिक्षक संजय उबारे, सर्व विषय शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.