वसमत
प्रतिनिधि
म. गांधी माध्य. विद्यालयातील पूर्णा प्रकल्प शाखेच्या विद्यार्थ्यांनी हिंगोली जिल्हातील टोकाई गड, वारंगा येथील वनोद्यान , तिर्थक्षेत्र स्वयंभू श्री जटाशंकर मंदिर डोंगरकडा व गुळप्रक्रिया उदयोग बागल पार्डी इत्यादी धार्मिक व ऐतिहासिक स्थळांना भेटी देऊन शैक्षणिक सहलीचा आनंद घेतला. महात्मा गांधी विद्यालयातील इयत्ता पाचवी ते आठवीच्या 41 विद्यार्थ्यांचे सहलीचे आयोजन केले होते . पालकांनी या शैक्षणिक उपक्रमाची दखल घेत मुलांना सहलीस परवानगी दिली. मुलांनी उत्स्फूर्तपणे या सहलीस प्रतिसाद देत सहलीचा आनंद घेतला. सहल रवाना होण्यापूर्वी संस्थेचे सचिव अॅड . रामचंद्रराव बागल , विद्यालयाच्या मु.अ. श्रीमती करजगीकर मॅडम , पर्यवेक्षक श्री मस्के सर यांनी शुभेच्छा दिल्या .
या शैक्षणिक सहलीत टोकाई गड कुरुंदा येथील टोकाई मातेचे दर्शन घेतले व सयाजी शिंदे यांनी निर्माण केलेले सह्याद्री वनराई बद्दल व औषधी वनस्पती बद्दल नागेश कळणे यांनी माहिती दिली तसेच श्रीनिवास मस्के सर यांनी कवितेतून विद्यार्थ्यांना सहलीचे व शालेय जीवनाचे महत्त्व पटवून दिले .वारंगा येथील वन उद्यानातील भवानी देवी ,महादेव मंदिराचे दर्शन घेऊन विद्यार्थ्यांनी मनसोक्तपणे विविध खेळातील साहित्याचा व परिसराचा आनंद घेतला . उद्यानातील विविध पशु पक्षांच्या प्रतिकृती वरून त्यांच्याबद्दल देविदास गुडालोड यांनी माहिती दिली. उद्यानात विविध खेळ खेळल्यानंतर वारंगा येथील प्रसिद्ध व्यावसायिक शिवराज कदम यांच्यातर्फे सहलीतील सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन दुपारचे जेवण मोफत देण्यात आले . पर्यटन स्थळाचा दर्जा असणारे डोंगरकडा येथील श्री जटाशंकर मंदिराची संपूर्ण माहिती ब . स्मा .महाविद्यालयाचे माजी उप प्राचार्य प्रा. पंजाबराव अंभोरे सर माजी प्रा .हमंद सर व प्रा . डॉ . सोनाजी पतंगे सर यांनी अभ्यासपूर्ण माहिती दिली व प्रा . पंजाबराव अंभोरे सरांनी सुंदर गीत सादर केले .बागल पार्डी येथील गुळ प्रक्रिया उद्योगाबद्दल आनंद जाधव व वासंती जोशी यांनी माहिती सांगितली .
या सहलीचे आयोजन संस्थेचे सचिव अॅड रामचंद्रराव बागल साहेब व सर्व पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद जाधव , शिवप्रसाद गुठठे ,देविदास गुडालोड ,नागेश कळणे व वासंती जोशी आदींनी सहलीच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .