शाळा यशवंतराव चव्हाण यांच्या स्मरणार्थ सुसज्ज अभ्यासिका सुरू करणार
वसमत
प्रतिनिधी ,
आपल्या कणखर बाण्याने आणि नेतृत्वगुणांनी महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्रीपदापासून ते केंद्रीय संरक्षणमंत्रीपद, गृहमंत्रीपद, अर्थमंत्रीपद आणि उपपंतप्रधानपद भूषवणारे लोकनेते यशवंतराव चव्हाण यांनी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या संकल्पनेतील पुरोगामी महाराष्ट्र घडवण्याची दिशा दाखवली.
महाराष्ट्रातील राजकारणाला आदर्श मापदंड देणाऱ्या
यशवंतराव चव्हाण यांना पुण्यतिथीनिमित्त
लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल, आणि मुक्ताई विद्यालय वसमतच्या विद्यार्थ्यांच्या वतीने शाळेच्या ज्ञानांगण परिसरात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने संस्थेचे अध्यक्ष प्रा डॉ नामदेव दळवी यांनी या आधीच एक यशवंतराव चव्हाण अभ्यासिका नवमहाराष्ट्र युवा अभियानाचे समनवयक निलेश भाऊ राऊत यांच्या हस्ते वसमत शहरात सुरू केली आहे .
पण येणाऱ्या 26 जानेवारी नन्तर अत्यंत सुंदर व सर्व सोयीनियुक्त एअर कंडीशनर अशी इन्टरनेट युक्त अभ्यासिका सुरू होत आहे ,या अभ्यासिकेत जवळपास १० हजार च्या वर ग्रंथसंपदा असणार असून वसमत तालुक्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्त्यांना स्वतंत्र विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे , शालेय विध्यार्थ्यासाठी स्वातंत बालविभाग बनविण्यात येणार आहे . हा विभाग २४ तास सुरू राहणार आहे .परिसरात शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे .मुलींसाठी स्वातंत पुस्तक बँक असणार आहे .
खास करून मुलींसाठी वसमत शहरात अभ्यासिका नाही त्यामुळे ही अभ्यासिका मुलींना प्राधान्य देणार आहे .
संस्थेच्या विठाई सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथालय विभागाची या कामी मदत घेण्यात येणार आहे .
असे यशवंतराव चव्हाण ,प्रतिष्ठान मुंबई
नवमहाराष्ट्र युवा अभियान , हिंगोली चे समन्वयक प्राध्यापक डॉक्टर नामदेव दळवी आणि संचालिका मीना इंगोले यांनी कळविले आहे