अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त केली वृक्ष लागवडीला सुरुवात
गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले यांचा स्तुत्य उपक्रम
वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागात नुकतीच अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली ,यानिमित्त शिक्षण विभागाच्या सभाग्रहात अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम ठेवण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समितीचे उपसभापती विजय नरवाडे , प्रमुख उपस्थिती पंचायत समितीचे, गटविकास अधिकारी विठ्ठल सुरवसे ,गटशिक्षणाधिकारी तानाजी भोसले, सहाय्यक
गटविकास अधिकारी बाबूलाल शिंदे , उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सनाउल्ला खान , राजर्षी शाहू पत संस्थेचे चेअरमन शंकरराव कदम , इत्यादी उपस्थित होते.
या कार्यक्रमात अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले या मान्यवरांमध्ये विठ्ठल सुरवसे, तानाजी भोसले, विजय नरवाडे , डॉक्टर सल्ला खान यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले
त्यानंतर शिक्षण विभागाच्या मोकळ्या जागेवर वृक्ष लागवड करण्यात आली यावेळी शिक्षण विभागाच्या वसमत तालुक्यातील सर्व शाळेत मिळून एक लाख वृक्ष लागवड करून ती जगविण्याचा निर्धार करण्यात आला
तसेच शिक्षिका मंगला खानापुरे यांचा आज सेवानिवृत्ती बद्दल शिक्षण विभागातर्फे सत्कार करण्यात आला . तसेच इयत्ता सातवीची विद्यार्थिनी श्रावणी मोहन हिरवे व दुसरी इयत्ता पाचवी ची क्रांती ज्ञानबा हिरवे या दोन मुलींनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर व्याख्यान केले यावेळी शिक्षक लांडगु, विठ्ठल पवार, वराड सर ,कल्याण आहेर, गारोडे, श्रीमती मंगला खानापुरे ,जाधव ,कदम, अशोक सातपुते ,भागवत कदम ,यासह शिक्षक,व शिक्षण विभागाचे कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुभाष खरबडे यांनी केली .
“”””””””””””””””””””””””””””””””””””””
आपण कोरोना सारख्या महाभयंकर रोगराईला सामोरे जात आहोत, त्यामुळे ऑक्सिजन ची अस्वस्था आपण बघितली आहे त्यामुळे भविष्यात आपल्याला जर कोण वाचविले तर ते फक्त ऑक्सिजनच त्यामुळे आपण आता फालतू कर्मकांडात आडकण्यापेक्षा झाडं लावली तरच आपल्याला भविष्यात लोकांचे जीव जातांना पहायला मिळणार नाहीत , म्हणून मानवाने आता खोटा अहंभावात राहण्यापेक्षा जमिनीवर यावे , आकाशाला गवसणी घालताना या मातृभूमीच्या गर्भात उद्याचे आपले अस्तित्व शोधावे , हेच आपल्या महामानवाना अभिप्रेत होते ,तेच काम आपण सर्व मिळून करूयात पुन्हा निसर्गाला जीवदान देऊयात आणि आपल्या तालुक्यातील गावागावातील शाळेत झाडे लाऊयात —-
गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले
“””””””””””””””””””””””””””””””””””