शिवसेना तालुका प्रमुख राजू चापके यांच्या पाठपुरावा यश
वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील पुयणी येथे वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसाला मंगळवार ता ८ शासनाची चार लाख रुपयांची मदत देण्यात आली आहे
यासाठी शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू चापके यांनी पाठपुरावा केला होता.
वसमत तालुक्यातील पुयणी येथील शेतकरी साहेबराव जामगे यांचा ता. 2 मे रोजी वीज पडून मृत्यू झाला होता. घरातील कर्ता पुरुष गेल्यामुळे जामगे यांचे कुटुंब अडचणीत सापडले होते. त्यांची अडचण लक्षात घेऊन खासदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू चापके यांनी तहसील कार्यालयाकडे आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा सुरू केला होता. शेतकरी जामगे यांच्या कुटुंबांना तातडीने मदत द्यावी अशी मागणीही त्यांनी केली होती. याशिवाय श्री राजु चापके यांनी त्यांचा वाढदिवसाचा खर्च टाळून जामगे यांच्या कुटुंबाला मदतही दिली होती तसेच आता खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे व खते ही उपलब्ध करून दिली.
त्यानंतर आज वसमतचे तहसीलदार अरविंद बेळगे, शिवसेना तालुकाप्रमुख राजू चापके यांच्या उपस्थितीत शेतकरी साहेबराव जामगे यांच्या पत्नी जिजाबाई जामगे व मुलगा सुरेश जामगे यांना शासनाकडून दिली जाणारी चार लाख रुपयांची आर्थिक मदत दिली आहे. यावेळी संभाजी बेले, विलास नरवाडे, दत्तराव भालेराव, काशिनाथ भोसले, राम साळवे, बंडू जामगे, बंडू हिवाळे,नाना जामगे, राजू पवार, बाबा अफुने,संकेत राजेश इंगोले,ईश्वर तांभोळी, अमोल मानकरी , उमेश डाडाळे ,शेख यासीन भाई , रामप्रसाद हरबळे, व्यंकटेश कराळे , नवराज चव्हाण , नवनाथ खराटे ,शिवराज यशवंते ,तलाठी सचिन जोंधळे, मंडळ अधिकारी राउत यांची उपस्थिती होती.