संभाजी ब्रिगेड उतरणार रस्त्यावर
वसमत
शहर प्रतिनिधी,
वसमत ते नांदेड 222 रोड चे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे पाटील कंट्रक्शन यांच्या विरुद्ध आन्दोलन छेडनार आशा स्वरूपाचे निवेदन वसमत संभाजी ब्रिगेड च्या वतीने
आज उपविभागीय अधिकारी साहेब वसमत यांना देण्यात आले .
त्यामध्ये वसमत ते नांदेड 222 रोडचे काम सुरू असून हे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे.
रस्त्याचे काम पूर्ण होण्याअगोदर रस्ता ऊखडत आहे.
मेन रोडवर काही महिन्यातच मोठे खड्डे पडले आहेत.
यामुळे अपघाताचे प्रमाण सुधा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे.
सदरील रोडच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून काम निकृष्ट दर्जाचे केले आहे.
त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी कंत्राटदार त्यांच्यावर अत्यंत कार्यवाही करण्यात यावी.
अन्यथा संभाजी ब्रिगेडच्या वतीने पाटील कन्ट्रक्शन च्या विरोधामध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
असा इशारा संभाजी ब्रिगेड वसमत च्या वतीने देण्यात आलेला आहे.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष अलोक भाऊ इंगोले.
संभाजी ब्रिगेडचे दोन्ही तालुकाध्यक्ष विजय डाढाळे ज्ञानेश्वर माखणे.
प्रमोद कदम नारायण खराटे नितीन भोसले सुरेश इंगोले मारुती कराळे मारुती मुळे अंकुश व्यवहारे इतर सर्व कार्यकर्ते उपस्थित होते