113 दिवसा नंतर लालपरी धावनार
तेही वंचीत बहुजन आघाडीच्या राज्यव्यापी डफली आंदोलनामुळे
हिंगोली
विशेष प्रतिनिधी
राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेला आंतरजिल्हा प्रवासी वाहतुकीसाठी परवानगी देण्यात आली आहे त्यामुळे सर्वसामान्य जनतेला दिलासा मिळाला आहे. लॉकडावून ठरविल्यानंतर राज्य सरकारने टप्प्याटप्प्याने सर्व सेवा सुरू केल्या होत्या .मात्र सार्वजनिक वाहतूक सुरू केल्याने त्याविरोधात गेल्या आठवड्यात वंचित बहुजन आघाडीने राज्यभर डफली बजाओ आंदोलन केले .सध्या करोना विषाणू covid-19 संसर्गाचा धोका निर्माण झाला असल्यामुळे शासनाकडून गर्दी कमी करण्याबाबत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत त्या अनुषंगाने 22/03/2020 पासून संपूर्ण देशात तसेच महाराष्ट्रात राज्यात लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याने राष्ट्रीय परिवहन महामंडळाची वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती दिनांक 22 /5 /2020 पासून जिल्हा अंतर्गत राष्ट्रीय परिवहन वाहतूक सुरू करण्यात आली. दिनांक 20/08/2020पासून अंतर्गतजिल्हा वाहतूक सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असून त्या अनुषंगाने विभागाद्वारे टप्प्याटप्प्याने वाहतूक सुरू करण्याची नियोजन करण्यात येणार असल्याची माहिती विभाग प्रमुख श्री मुपडे यांनी दिली .राष्ट्रीय परिवहन महामंडळामार्फत चालविण्यात येणाऱ्या बससेवाची ई – पासची आवश्यकता राहणार नाही.
शासनांनी निर्देशित केल्याप्रमाणे सोशल डिस्टंसिंग चे निर्णय नियम पाळून त्याप्रमाणे वाहतूक करावयाची आहे अशी माहिती सुत्रांकडून मिळाली