सह्याद्री स्कुल गरजूंचे शिक्षण थांबू देणार नाही.
वसमत
शहर प्रतिन
सह्याद्री पब्लिक स्कुल, वसमत तर्फे २०२१-२२ नव्या शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच पालकांना अनोखी भेट जाहीर केली आहे.
या सत्रात प्रवेश घेणाऱ्या
• आर्थिक दुर्बल घटकातील व गरजू विद्यार्थ्यांना फिस मध्ये ५० % सूट असणार आहे.
• अल्पभूधारक शेतकऱ्याची मुले, आर. टी. इ २५ % मोफत योजनेत ज्यांना प्रवेश मिळाला नाही , (ज्यांचे एक लाखाच्या आत उत्पन्न आहे ) अशां RTE त नंबर न लागलेल्या बालकांना पुढील पाच वर्षे ५० % शुल्क माफी असेल.
• गतवर्षी प्रमाणेच यावर्षीही वर्दीधारी सैनिक, बॉर्डर वर लढणारे शिपाई, सुरक्षा रक्षक, सेवानिवृत्त सैनिक यांची मुले व आत्महत्या ग्रस्त शेतकऱ्यांची मुले यांनाही ५० % शुल्क माफी.
• मागील २०२०-२१ सत्राची सर्वच विद्यार्थ्यांना ५० % शुल्क माफी.
• करोना पॅन्डामिक मध्ये निराधार झालेल्या बालकास मोफत प्रवेश १०० % शुल्क माफी
इत्यादी..
करोनांमुळे ऊद्भवलेल्या या बिकट स्थितीत अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, हातचे काम गेले त्यामुळे मुलांचे शिक्षण ही मूलभूत गरज भागते की नाही याची चिंता लागलेली असतांना होतकरू मुलांच्या पालकांना या विविध योजनांमुळे दिलासा मिळणार असून या कठीण काळात विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबणार नाही. प्राचार्य जि एन कदम यांचा २६ जून जन्म दिवस, या दिवसापासून सर्व योजनां सुरू होतील, गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी हा संदेश सर्वांपर्यंत पोहचवून आर्थिक अडचणीत बालकांचे शिक्षण थांबू नये म्हणून सहकार्य करावे, तसेच गरजूंनी 8149262000, 9850210550 या क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा व शहरी तसेच ग्रामीण भागातील सर्व गरजूंनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थे तर्फे करण्यात आले आहे.
सामाजिक बांधिलकी जपत या बिकट काळात शुल्क माफी देऊन शिक्षणाची जबाबदारी घेणाऱ्या सह्याद्री स्कुलच्या या शैक्षणिक उपक्रमाचे परिसतात सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.