एफ आर पी (Frp) आमच्या हक्काचा… नाही कुणाच्या बाप्पाचा घोषणा देऊन पुढील आंदोलन दिशा ठरणार.
वसमत
शहर प्रतिनिधी
वसमत तालुक्यातील कुरंदा परिसरातील शेतकऱ्यांसोबत कारखाना प्रशासन वारंवार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. शेतकऱ्यांच्या कष्टाचे व हक्काचे पैसे अद्याप देण्यात दिरंगाई करण्यात येत आहेत. टोकाई सहकारी साखर कारखान्याचे सर्व सभासद व ऊस उत्पादक शेतकरी यांनी दि. २५/०८/२०२२ रोजी कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफ.आर.पी (Frp) शिल्लक रक्कम तात्काळ देण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते परंतु कारखान्याने आज पर्यंत कुठलीही कार्यवाही केली नाही. त्यामुळे आता आंदोलनाशिवाय पर्याय नाही. तेंव्हा आंदोलनाच्या अनुषंगाने कुरुंदा येथे संभाजी ब्रिगेड व परिसरातील सभासद शेतकरी व ऊस उत्पादक शेतकरी यांची एफ आर पी (Frp) संदर्भात दि. 13 सप्टेंबर रोजी कुरूंदा येथे महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
या बैठकीत काखाण्याने एफ . आर . पी संदर्भात तात्काळ भूमिका न घेतल्यास आंदोलन करण्याचा निर्धार करण्यात आला व तसेच एफ . आर . पी . दिल्याशिवाय पूढील गळीत हंगाम सुरू होऊ देणार नाही असा निर्धार करण्यात आला . यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड जिल्हाउपाध्यक्ष सुरेशराव इंगोले, विधानसभा अध्यक्ष आलोक इंगोले , सर्कल अध्यक्ष मारोती मुळे तसेच सभासद व ऊस उत्पादक शेतकरी मोठ्याप्रमाणात उपस्थितीत होते.