हिंगोली
प्रतिनिधी,
येथील श्री योगानंद स्वामी महाविद्यालयात दीक्षांत कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, दि. २३ सप्टेंबर, २०२२ रोजी सकाळी ८:३० वाजता करण्यात आले आहे.या कार्यक्रमात बी.ए. तृतीय वर्ष उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे. संबंधित विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यासाठी संयोजन समितीतर्फे कळविण्यात आले आहे .
हा दीक्षांत समारंभ माजी सहकारमंत्री तथा संस्थाध्यक्ष डॉ.जयप्रकाश मुंदडा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या मानवविज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ. अजय टेंगसे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वितरण केले जाणार आहे. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून श्री. अरविंद बोळंगे, तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी,तहसिल कार्यालय, वसमत हे उपस्थित राहणार आहेत. या समारंभात प्रमुख अतिथी,मान्यवर स्नातकांना उद्देशून मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .नागनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दीक्षांत समारंभ संयोजन समितीचे सदस्य डॉ. गौतम कांबळे, डॉ. संजय गायकवाड, डॉ.सुभाष ठोके, डॉ.ज्योतीराम चव्हाण , डॉ.कमलाकर चव्हाण यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्रशासकीय कर्मचारी प्रयत्न करीत आहेत. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. नागनाथ पाटील व संयोजन समितीने केले आहे.