वसमतला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी 5 लक्ष रू जमवून दिले आरोग्य केंद्रांना ऑक्सिजन कॉन्सट्रेटर
गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले यांच्या कल्पकतेतून उभारला 5 लाखाचा निधी
वसमत
शहर प्रतिनिधी
मानवी जीवनात ऑक्सिजन ला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे हे कोरोनाने जगाला दाखवून दिले , ऑक्सिजन मुळे अनेकांनी आपला जीव सोडला मानवाला सर्वात जास्त ऑक्सिजन हे झाडापासूनच मिळतो झाडंच वाचली नाही तर ऑक्सिजन तयार करण्याच्या मशीनचा काय उपयोग के ? असा सवाल हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधविनोद शर्मा यांनी व्यक्त केला
ते वसमत येथील लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल मध्ये आयोजित वसमत तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शिक्षकांनी स्वतःच्या पगारातून चार लाख सत्तावीस हजार नऊशे रुपये
जमा करून वसमत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राना राधविनोद शर्मा यांच्या हस्ते ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मोफत वाटप केले .
यावेळी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते
पुढे बोलताना राधा विनोद शर्मा म्हणाले की ज्याप्रमाणे वसमत तालुका सर्वच क्षेत्रांमध्ये नंबर एक वरती आहे त्याप्रमाणे भविष्यात आपण शिक्षण क्षेत्रात सुद्धा नंबर एक बनावे त्यासाठी शाळेचा परिसर शाळा स्वच्छ व सुंदर बनला पाहिजे त्यासाठी शिक्षकच कठोर परिश्रम करून ते बनवू शकतात याचा मला विश्वास आहे आपण गुणवत्तेत आहोत त्याचप्रमाणे स्वच्छतेत आणि सुंदर ते सुद्धा असावे आपला शाळेचा परिसर हा निसर्गाने झाडा फुलांनी आणि लेकरांनी बहरला पाहिजे असे ते म्हणाले
हिंगोली जिल्हा कोरोना रुग्णात राज्यात सर्वात कमी रुग्ण असलेला जिल्हा आहे , आमच्या शिक्षकांनी कोरोना काळात खूप चांगले काम केले आहे .
कार्यक्रमाचे प्रस्तावित गटशिक्षणाधिकारी तान्हाजीराव भोसले यांनी केले
या कार्यक्रमात हिंगोली जिल्हा परिषदेचे प्राथमिक चे शिक्षणाधिकारी संदीप सोनटक्के , जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार वसमतचे तहसीलदार अरविंद बोळगे ,वसमत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री सुरोशे ,वसमत तालुका आरोग्य अधिकारी सुनील देशमुख , वसमत डॉक्टर असोसिएशनचे डॉ निलेश दिग्रसे , उपगटविकास अधिकारी श्री शिंदे गटशिक्षणाधिकारी तान्हाजी भोसले यांची उपस्थिती होती
यावेळी एकून आक्सिजन कान्सट्रेटर 11 पैकी हट्टा, हयात नगर, गिरगाव,टेंभूर्णी,कुरूंदा,शिंदे पांग्रा आणि शुक्रवार पेठेतील युपीएससी ला प्रत्येकी एक ग्रामीण भागातील प्रा. आरोग्य केंद्रास लोकार्पण सात आणि चार मशीन वसमतकरांसाठी एमरजंशी म्हणून राखीव ठेवण्यात आल्या आहेत यांनातर शर्मा साहेबांनी जी प शाळा सनग्नापूर शाळेच्या विद्यार्थ्याने लॉकडाऊन काळात बॅटरीवर चालणारी स्वयंचलित सायकल व बनविलेल्या विविध प्रयोगाची पहाणी केली ,तसेच वसमत पंचायत समिती शिक्षण विभागाने राबविलेल्या मिशन एक लक्ष वृक्ष लागवड, घनदाट वृक्ष लागवड आणि सुंदर माझे कार्यालय या उपक्रमाची पहाणी केली ,केंदीय शाळा पूर्णा कारखाना , वाखारी , बाभूळगाव , गिरगाव या शाळांना भेटी देऊन केलेल्या सुंदर शाळांची प्रशंसा केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शिवदास पोटे सर यांनी तर आभार श्री शर्मा सर यांनी केले
“”””””””””””””””””””””””””””””””””””””
मुख्यकार्यकारी अधिकारी यांनी केले लिटल किंग्ज शाळेतील परिसराची प्रशंसा व कौतुक
यावेळी आपल्या भाषणात राधविनोद शर्मा यांनी वसमत येथील गुणवत्ता पूर्ण डिजिटल युक्त लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल परिसरातील झाडे निसर्ग आणि शैक्षणिक वातावरणाची आपल्या मनोगतात कोतुक व प्रशंसा केली , आणि असाच जिल्हा परिषद शाळेचा परिसर झाला पाहिजे अशी जिल्हा परिषदेच्या शिक्षकाकडून अपेक्षा व्यक्त केली
“”””””””””””””””””””””””””””””””””””””