सानेगुरुजी फिरते वाचनालयाचे उदघाटन व कष्टकरी महिलांना ब्लॅंकेट वाटप
वसमत तालुक्यातील मौजे सारोळा या गावी शेतकरी व कष्टकऱ्यांशी संवाद अभियान हा कार्यक्रम दिनांक 13 डिसेंबर 2020 रविवार रोजी सकाळी आठ वाजता हनुमान मंदिरासमोर घेण्यात आला.राष्ट्र सेवा दल व जीवनसाधना फाऊंडेशनच्या वतीने या अभियानांतर्गत कष्टकऱ्यांच्या मुलांसाठी सानेगुरुजी फिरते वाचनालयाचे उदघाटन ऍडव्होकेट जयप्रकाश गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या हस्ते झाले.गावातील वीस कष्टकरी महिलांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.अध्यक्षस्थानी डॉक्टर बालाजी कऱ्हाळे होते.या अभियानाचे मुख्य संयोजक एस.एम.कदम (सुखानंद)यांनी प्रास्तविक केले.जलपुनर्भरण,सौर ऊर्जेचा वापर,वृक्षारोपण,स्वच्छता,शिक्षण,स्वयंरोजगार,व्यसनमुक्ती यांसारख्या गोष्टी गावाच्या विकासासाठी महत्वाच्या आहेत.ग्रामविकासासाठी सर्वांनी संघटित होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन केले.उदघाटक ऍडव्होकेट जयप्रकाश अग्रवाल यांनी स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय गंगाप्रसादजी अग्रवाल यांच्या कार्याविषयी माहिती दिली.डॉक्टर बालाजी कऱ्हाळे यांनी आरोग्यविषयक माहिती दिली.गजानन ढोरे पाटील यांनी मार्गदर्शन केले.
हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी पांडुरंग कदम व गावकऱ्यांनी अथक परिश्रम केले.
या कार्यक्रमाला पांडुरंग कदम,शंकर गंगारामजी कदम,प्राध्यापक डॉक्टर नामदेव दळवी,शंकरराव कदम,रामराव कदम,विठ्ठलराव कदम,हरिदास कदम,उत्तमराव दुधाटे यांची उपस्थिती होती.