सतिश पाटील महागावकर
जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड, हिंगोली
राजकिय
हिंगोली विशेष
“पोलिटिकल किडे ” ही भाजपच्या सोशल मीडिया ची पैदास आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सोबत मा. नरेंद्र मोदींची तुलना किंवा सरदार तानाजी मालुसरे सोबत मा. अमित शहा यांची (फोटो टाकून) तुलना करणे हा निव्वळ बावळट व मुर्खपणा आहे. हा मुळ (CAB, NRC विरोधी आंदोलन) मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रकार आहे. ज्यांनी रक्त सांडून स्वराज्य निर्माण केलं, ज्यांनी मुठभर मावळ्यांना सोबत घेऊन सर्व समाजासाठी लोक कल्याणकारी राज्य निर्माण केलं, शिवराज्य स्थापन केले… त्यांच्यासोबत मोदी यांची तुलना करणे हा निव्वळ बालीशपणाचे वाटते. छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कोणाची ही तुलना होऊ शकत नाही आणि जर तुलनाच करायची झाली तर… ‘शिवाजी महाराजांसोबत फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचीच होऊ शकते. बाकी कुठल्याही आयऱ्या गैऱ्याशी तुलना होऊ शकत नाही. हा सामाजिक दहशतवाद तात्काळ थांबला पाहिजे.
जयभगवान गोयल याने पुस्तकात तुलना केली आणि त्यांच्यात भाजपच्या सोशल मीडियातील अंध भक्तांनी (किड्यांनी) फेसबुक वर तुलना केली ही देशाशी गद्दारी आहे. ज्या पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायापाशी बसून (मतांसाठी) आर्शिवाद मागितले, शपथ घेतली… मतांचा जोगवा मागितला त्याच मोदींजीची तुलना परत छत्रपती शिवाजी महाराजांसोबत कशी काय होऊ शकते… हा संशोधनाचा आणि विचार करण्याचा विषय आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रपुरुष आहेत. त्यांची तुलना कुणाशीही होऊ शकत नाही. वैचारिक करंटेपणा करणाऱ्यांनी विनाकारण तुलना करू नये. मूर्ख लोकांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी वेळीच अडवावे… अन्यथा गाठ संभाजी ब्रिगेडचे आहे…! हे लक्षात ठेवावे.
तरुणांना रोजगार नाहीत, महागाई दिवसेंदिवस वाढत आहे, सुशिक्षित बेरोजगार अत्यवस्थ आहेत, महिला सुरक्षित नाहीत, शेतकरी आत्महत्या करून मरत आहे. देश आर्थिक संकटात आहे. देशाचा विकास दर शून्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. सामाजिक आणि धार्मिक वातावरण अतिशय गढूळ बनवले जात आहे. समाजात अस्थिरता निर्माण झालेली असताना… जाणीवपूर्वक लक्ष विचलीत करण्यासाठी मोदी, शहा व नढ्ढा यांचा ट्रिपल गेम आहे… अशी शंका येत आहे. छत्रपती शिवरायांची तुलना करणारे पुस्तकी व सोशल मीडियातील देशाचे गद्दार उभे सोलून काढले पाहिजेत. हा खरा #सोशल_दहशतवाद आहे. असले बालीश प्रकार सरकारने तात्काळ थांबले पाहिजेत.
देशातील वरिष्ठ नेत्यांचा सन्मान करा, परंतु, महापुरूषांशी तुलना करू नका…!