स्वतंत्र एफ एम केंद्राला मंजुरी
LK मराठी न्यूज अपडेट
प्रतिनिधी
हिंगोली ,
हिंगोली लोकसभा मतदार संघात एफ एम प्रसारणाची गरज लक्षात घेवून मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली मध्ये एफ एम केंद्र सुरु करावे अशी मागणी केली होती, या मागणीला केंद्र सरकारच्या प्रसारण मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. लवकरच हिंगोली येथे एफ एम केंद्र सुरु करण्यात येणार आहे.
शेती, शिक्षण आणि आरोग्याच्या बाबतीत आकाशवाणी केंद्र नेहमीच महत्वाची भूमिका बजावत आले आहे. प्रामुख्याने आदिवासी बहुल असलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघात एफ एम प्रसारणाची गरज लक्षात घेता हिंगोली मतदार संघाचे लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांनी संसदेच्या डिसेंबर महिन्यात झालेल्या अधिवेशनात हिंगोली लोकसभा क्षेत्रासाठी स्वतंत्र एफ एम केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी केली होती. अधिवेशनात खा.पाटील यांनी सांगितले होतज की, सध्याच्या काळात एफ एम केंद्राचे महत्व वाढत आहे. मनोरंजना बरोबर ज्ञान विस्तारासाठी मोठ्या प्रमाणात एफ एम केंद्राचा वापर होत आहे, यामध्ये शेती विषयक, पर्यावरण, वातावरण, आरोग्य, याबद्दलची माहिती मनोरंजनाच्या माध्यमातून दिली जाते. हिंगोली लोकसभा मतदार संघाचे क्षेत्रफळ ४६० किमीचे असून त्यामध्ये ११ तालुक्यांचा समावेश आहे. त्यामुळे याठिकाणी एफ एम केंद्र गरजेचे आहे, अशी मागणी करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. या मागणीची दखल केंद्रीय प्रसारण मंत्रालयाने घेतली व हिंगोली येथे १०० वॅट चे एफ एम केंद्र सुरु करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. प्राथमिक स्वरूपात केंद्र चालविण्यासाठी आवश्यक असलेली फ्रीक्वेन्सी ची चाचपणी करण्यात येणार असून येत्या ऑक्टोबर अखेर काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. एफ एम केंद्राच्या स्थापनेसाठी लागणारा निधी येत्या अर्थसंकल्पात मंजूर केला जाणार आहे. मतदार संघातील जनतेची मागणी आणि लोकप्रियतेवर या केंद्राची व्याप्ती काळानुसार वाढविण्यात येईल असे हि सांगण्यात आले आहे. तसेच या केंद्रासाठी लागणार सर्व निधी केंद्र सरकाराच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात येणार आहे. यापूर्वी सुद्धा खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोली मतदार संघाच्या विकासासाठी संसदेत प्रश्न उपस्थित करून मागण्या मंजूर करून घेतल्या आहेत . हिंगोली जिल्ह्यातील रेल्वे, उद्योग पीकविमा, हळद प्रक्रिया उद्योग, नुकसान भरपाईची वाढीव मागणी यातील सर्वच मागण्याची दाखल घेण्यात आली आहे.