वसमत आगारात सुरक्षितता मोहीम कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न
वसमत,
प्रतिनिधी ,
नाहीद सिद्धीकी,
वसमत येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ तर्फे आगारात सुरक्षितता मोहीम एक जानेवारी ते 25 जानेवारी या या कालावधीत उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आगाराचे आगार प्रमुख रा. य मुपडे हे होते तर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती वसमत शहर पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील, पत्रकार नाहीद सिद्दिकी, डॉ. बालासाहेब सेलूकर, वाहतूक निरीक्षक चव्हाण, विभागीय कार्यकारी वर्ग अधिकारी सुभेदार, यांची उपस्थिती होती
आपल्या मनोगतात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील म्हणाल्या की, एसटी चा प्रवास हा सुरक्षित असतो. महामंडळाच्या चालकांनी आपली मनस्थिती व्यवस्थित ठेवून कार्य केल्यास नक्कीच अपघात टळू शकते असे मनोगत त्यांनी व्यक्त केले तर पोलीस निरीक्षक खंडेराया यांनी आपल्या मनोगतात रस्त्याचे नियमाचे व पालन करून वाहतूक करावी असे आवाहन केले याप्रसंगी अध्यक्षीय समारोप मनोगतात आगारप्रमुख रा.य मुपडे यांनी आगारातील चालकांचे कौतुक केले व काही चालकांना येत्या 26 जानेवारीला उत्कृष्ट चालक म्हणून बक्षीस वितरण सोहळा होणार असल्याचे सांगितले सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वरिष्ठ लिपिक शेख जावेद यांचे मोलाचे कार्य होते. या वेळी कट्टेकर, चहाड , अटकोरे, यांच्यासहआगारातील चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, यांची उपस्थिती होती