वसमत ,
प्रा नामदेव दळवी
वसमत तालुक्यातील सर्वात मोठी समजल्या जाणाऱ्या ग्रामपंचायत कुरुंदा येथील सरपंच पदाची निवड दिनांक 27/12/2019 रोजी घेण्यात आली. यावेळी सरपंच पदासाठी एकमेव नामनिर्देशन पत्र डॉ. प्रितीताई प्रभाकर दळवी यांचे आले होते त्यामुळे
ही निवडणूक बिनविरोध पार पडली यामध्ये सरपंचपदी शिवसेनेच्या डॉ. प्रीतीताई प्रभाकर दळवी यांची सरपंच पदी बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली कुरुंदा गावाला पहिल्यांदाच उच्चशिक्षित महिला सरपंच लाभल्या. व्यवसायाने त्या डॉक्टर असून त्या कुरुंदा येथील संजीवनी हॉस्पिटल च्या संचालिका आहेत आणि डॉक्टर प्रभाकर विश्वनाथ रावजी दळवी यांच्या त्या पत्नी आहेत ,
यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी केशवराव अंभोरे, तलाठी गरुड साहेब, ग्राम विकास अधिकारी कोकरे यांनी काम पाहिले यावेळी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सभापती चंद्रकांत पाटील दळवी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेश पाटील इंगोले, नरहर कुरुंदकर शिक्षण संस्थेचे सचिव मुंजाजीराव इंगोले, नरहर कुरुंदकर विद्यालयाचे प्राचार्य बबनराव कदम सर, सोसायटीचे चेअरमन बाबुराव शेवाळकर, माजी शिक्षण सभापती रंगराव कदम, शिवसेना उपतालुका प्रमुख विश्वनाथराव दळवी, व्हाईस चेअरमन बाळासाहेब इंगोले, दतरव इंगोले पाटील, फारुख हवालदार, मुंजाजी दळवी, काशिनाथराव दळवी, राजेश इंगोले, विष्णूराजे इंगोले, वसंत इंगोले, शेख. ताहेर भाई, शेख. रोप भाई, प्रतिष्ठित नागरिक व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कुरुंदयाच्या सरपंच पदी पहिल्यांदाच उच्याशिक्षित डॉ, प्रीती दळवी
Leave a comment