अध्य़क्षपदी शंकरराव कदम तर उपाध्य़क्ष पदी व्यंकटराव जाधव यांची निवड
हिंगोली ( वसमत )
प्रा. नामदेव दळवी
समाजातील वेगवेगळ्या घटकातील जनतेच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी सेवाभाव वृत्तीने कार्यकरणाऱ्या सर्वजाती धर्मातील कार्यकर्त्याचा जनसेवा विकासमंच स्थापन करण्यात आला आहे. वसमत येथे संपन्ऩ झालेल्या बैठकीत पुढील कार्यकारणी सर्वानुमते निवडण्यात आली. शंकरराव कदम – अक्ष्य़क्ष, व्यंकटराव जाधव – उपाध्य़क्ष, सुभाषराव भोपाळे – कार्याध्य़क्ष, दत्तराव नवले – सचिव तसेच सार्वजनिक विवाह सोहळा समिती प्रमुख – विठ्ठल लडके, आरोग्य़ सेवा समिती प्रमुख – डॉ. गंगाधर काळे, किसान ब्रिगेड मंच प्रमुख – देविप्रसाद ढोबळे, कायदा सल्लागार समिती प्रमुख – शेख करिमोद्दीन युवा जागृती समिती प्रमुख – रघुनाथदादा सुर्यवंशी यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
पदाधिकाऱ्याचे सर्व स्त़रातुन स्वागत होत आहे. यावेळी नागोराव गुंजकर, संजय राखोंडे, भोजराव पाटील, मुरलीधर कदम, दिगंबर आहेर, मुंजाजी अंभोरे, नवनाथ चकोर, शेख सलिम, गोपिनाथ सारंग, अरुणभाऊ तोतला, प्रभाकर नवले आदि कार्यकर्ते उपस्थित होते.