वसमत
शहर प्रतिनिधी
पूर्वी मराठा समाजातील एकत्र कुटुंब व्यवस्था ही त्या कुटुंबातील अनेक प्रश्न सोडवणारी व्यवस्था होती ती आदर्श व्यवस्था होती दिवसभर कस्ट करून रात्री सगळं कुटुंब एकत्र बसायची उद्याच्या कामच नियोजन व्हायचं त्यातून आदर्श कुटुंब निर्माण व्हायचं , ती आता लोप पावलीत पण समाजातील आदर्श व्यक्तींनी वर्षातून एकदा तरी हे सगळं कुटुंब एकदा तरी एकत्र आणून आपल्याकडे असलेले जे जे आदर्श आहे ते त्या सर्व कुटुंबातील सदस्य यांना द्यावे असे विचार मांडले
वसमत तालुक्यातील आंबा चोंडी या गावात धावती भेट दिली त्या प्रसंगी तुकाराम महाराज मंदिरात गावकर्यांसोबत चर्चा केली व मार्गदर्शन केले
आता मराठा समाजाने वाईट चाली रीती परंपरा सोडून द्याव्यात व्यसन हा समाजाला लागलेली कीड आहे , तरुण मुलांनी एकत्र येऊन काहीतरी विधायक काम करावे, शिक्षण घ्यावे गावं सोडावीत , मिळेल ते काम करावं उद्योग उभारावेत गावचं मंदिरात आता अभ्यासिका सुरू कराव्यात , संत तुकाराम, संत गाडगेबाबा महाराज, तुकडोजी महाराज, यांचे विचार आत्मसात करावे असेही विचार यावेळी समाज बांधवांसमोर त्यांनी मांडले या वेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
हरियाणा येथील रोड मराठा समाज बांधवांनी गावकऱ्यांरी महिलांनी केली ओवाळणी
या वेळी पुरुषोत्तम खेडेकर यांच्या सोबत आलेले हरियाणा , पानीपत येथून आलेल्या मराठा समाजातील मान्यवरांचे आंबा गावातील महिला मंडळींनी ओवाळणी करून पारंपरिक पद्धतीने गावात स्वागत केले यावेळी पानिपत येथील मांगीरामजी चोपडे, परमार सिंगजी ,सिद्धनाथ सिंगजी यांच्या सोबत आलेल्या पाहुणे मराठा बांधवांनी आम्ही आपल्या कुटुंबात आल्याचं समाधान वाटले अशी प्रतिक्रिया व्यक्त केली