शाळेचे १९ विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र .
वसमत
प्रतिनीधी,
मागील दीड दशकाच्या कालावधीत वसमतच्या लिटल किंग्स इंग्लिश स्कूलने शिक्षण क्षेत्रामध्ये आपलं
अगळवेगळ स्थान निर्माण केले आहे. विविध स्पर्धा परीक्षेचे आयोजन करून त्या स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना योग्य आणि मोलाचे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक सामाजिक विकास साधण्याचे काम लिटल किंग्स इंग्लिश स्कूल ने केले आहे.
नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाल्या असून या शाळेचे माध्यमिक व पूर्व माध्यमिक मधून एकूण 39 विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते त्यापैकी 19 विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा पात्र झाले आहेत.
ज्यात इयत्ता पाचवी मधून संस्कृती शेजूळे, स्वरूपा नादरे, साई म्यकलवार, श्रद्धा माने, कृष्णा बोखारे ,अनन्या मुळे, धनंजय चव्हाण, विजया रावळे ,गजानन चव्हाण आणि इयत्ता आठवी मधून ऐश्वर्या कातोरे ,सोहम वाघिले, सिया वाघिले ,हर्षवर्धन सवंडकर ,सोहम वाघमारे ,विघ्नेश मेहता, राफे आफान कुरेशी, संकल्प कोम्पलवार, ऋतुजा बोकारे ,बुद्धभूषण खंदारे .
या विद्यार्थ्यांना शाळेने नियोजनबद्ध स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेतली होती .सदरली विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व विषय शिक्षक शाळेचे मुख्याध्यापक गोविंद दळवी संस्थापक प्राध्यापक डॉक्टर नामदेव दळवी संचालिका मीना इंगोले यांनी मार्गदर्शन केले होते .
शाळेची स्पर्धा परीक्षांमध्ये आणि विविध स्पर्धेमध्ये गुणवत्ता प्राप्त करण्याची एक वेगळी परंपरा राहिली आहे.
वसमत येथील या शाळेला नुकताच आयएसओ चा दर्जा सुद्धा मिळाला आहे.
या यशाबद्दल वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणअधिकारी तानाजीराव भोसले केंद्रप्रमुख, जिल्ह्याचे प्राथमिक शिक्षणाधिकारी आणि माध्यमिक
श्री संदीप कुमार सोनटक्के यांनी आणि शाळेचे पालक यांनी विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.