राज्यातून हजारो संस्थाचालक प्रतिनिधी उपस्थित राहणार. – प्रदेशअध्यक्ष. प्रा डॉ नामदेव दळवी
वसमत
शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र इंग्रजी शाळा संस्थाचालक संघटना अर्थात मेस्टा हे महाराष्ट्रातील 18000 इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे संघटन असणारी एकमेव संघटना असून या संघटनेचे दिनाक 19 एप्रिल 2022 रोजी मुंबई मंत्रालयासमोर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मुख्य सभागृहामध्ये राज्यस्तरीय अधिवेशन संपन्न होत आहे .
या अधिवेशनात इंग्रजी माध्यमातील शाळांच्या विविध समस्या यावरील उपाय भविष्यात निर्माण होणाऱ्या समस्या आणि येऊ घातलेले राष्ट्रीय शिक्षण धोरण यावरती दिवसभर विचारमंथन होणार असून या अधिवेशनासाठी राज्याचे पर्यावरण पर्यटन मंत्री मा.ना. आदित्य ठाकरे साहेब, राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री माननीय प्रा.वर्षाताई गायकवाड, राज्यमंत्री शालेय शिक्षण ओमप्रकाश ( बच्चू) कडू, उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदयजी सामंत, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, आमदार सचिन आहेर, अनिल गावंडे प्रदेश अध्यक्ष प्रहार संघटना तसेच माननीय डेव्हिड प्लॅनेट ऑस्ट्रेलियाचे केंद्रीय शिक्षण मंत्री, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष म्हणून महाराष्ट्र राज्याचे शिक्षण राज्यमंत्री आदरणीय बच्चुभाऊ कडू हे आहेत.
या अधिवेशनाची जोरदार तयारी मागील पंधरा दिवस मुंबईत ठाण मांडून बसलेले संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजयराव तायडे पाटील अत्यंत नियोजनपूर्वक करत आहे हे विशेष.
सदरील अधिवेशनात कोराेना काळात शाळा बंद असताना सुद्धा इंग्रजी माध्यमाच्या शाळांनी अत्यंत परिश्रमपूर्वक ऑनलाइन पद्धतीने शाळांना शिकवणी सुरू ठेवल्या मुलांची ऑनलाइन शिक्षण यातून पूर्ण केले त्यानिमित्त महाराष्ट्रातील उत्कृष्ट शाळांना आदर्श शाळा पुरस्कार, आदर्श संस्थाचालक पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श प्राचार्य पुरस्कार तसेच कोराेणा काळात उत्कृष्ट भूमिका केल्याबद्दल covid-19 वारियर्स हे पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते इंग्रजी माध्यमातील शाळांच्या प्रशासनाला प्रदान करण्यात येणार आहेत.
या अधिवेशनासाठी महाराष्ट्रातील हजारो संस्थाचालक यांची उपस्थिती राहणार आहे तसे नियोजन संघटनेच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी मागील महिनाभरापासून सुरू केले आहे .
या राज्यस्तरीय अधिवेशनात इंग्रजी माध्यमाच्या शाळांना भेडसावणाऱ्या प्रश्नाबद्दल 12 ठराव पारित करुन ते महाराष्ट्र शासनाकडे मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये सादर करण्यात येणार आहेत.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी राज्यातील संघटनेचे विविध पदाधिकारी विभागातील पदाधिकारी जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी अत्यंत परिश्रमपूर्वक नियोजन करत आहेत.
कोरोनाच्या बिमारी मुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई आणि वडील मृत्युमुखी पडले अशा शेकडो विद्यार्थ्यांचे मेस्टा संघटनेच्या शाळांनी पूर्णपणे फी माफ केली असून त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारले आहे.
अधिवेशनात खालील ठराव पारित करण्यात येणार आहेत
“”””””””””””
१. 25% आर टी प्रवेशाचे निधी प्रतिपूर्ती डी बी टी द्वारे प्राप्त व्हावेत.
२. स्वतंत्र इंग्रजी माध्यम शाळा संरक्षण कायदा करावा.
३. विना टी सी प्रवेश रद्द करावा.
४. कोरोना काळातील स्कूल बस टॅक्स पूर्णपणे माफ करावा
५. शाळांना देण्यात येणारा विद्युतपुरवठा कर व्यावसायिक रद्द करावा.
६. शिक्षकांना लागणारा पगारावर प्रोफेशनल टॅक्स रद्द करावा.
७. शाळा व शाळेतील शिक्षक व विद्यार्थी यांना विमा संरक्षण द्यावे.
८. नवीन शाळा मान्यता देताना ब्रहत आराखड्याची अंमलबजावणी व्हावी.
९. प्राथमिक शाळा मान्यतेनंतर नैसर्गिक वाढ प्रमाणे पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी पर्यंत दर्जावाढ रद्द करावे त्याऐवजी शाळांना दरवर्षी नैसर्गिक वर्गवाढ देण्यात यावी.
१०. जि प शाळा प्रमाणे इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थ्यांना सुद्धा गणवेश द्यावा.
११. शैक्षणिक वर्ष 2020 – 21 मधील देण्यात येणारा आरटीई निधी आठ हजार रुपये रद्द करून नियमानुसार बिल देण्यात यावे. 12.ज्या संस्थांनी तत्कालीन बाजारभावाप्रमाने शाळांसाठी राखीव असलेले शासकीय भूखंड घेतले त्यांना आरटिई प्रतीपुर्ती रक्कम देण्यात यावी
तेंव्हा जास्तीत जास्त इंग्रजी माध्यमाच्या शाळा संस्थाचालक यांनी उपस्थित राहन्याचे आवाहन प्रदेश अध्यक्ष प्रा डॉ नामदेव दळवी यांनी केले आहे.