१५ विद्यार्थी स्कॉलरशिप धारक
हिंगोली
प्रतिनिधी
वसमत शहरातील सतत गुणवत्तेत अव्वल असलेली आणि सतत शैक्षणिक प्रयोग राबविणारी शाळा म्हणून प्रसिद्ध असलेले लिटल किंग्ज इंग्लिश स्कूल या शाळेतील एकूण 15 विद्यार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयोजित शिष्यवृत्ती परीक्षेत शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत
कोव्हिडं महामारीच्या काळातही ऑनलाईन शिकवणी घेऊन इयत्ता
५ वी तील १० विद्यार्थी कु. दिव्या दिगंबर तोंडेवाड, पृथ्वीराज गजानन ढोरे , रुद्रा व्यंकट कदम , कु.अक्षरा विलास पंडित , कु.आर्या सुनील नायक , साईराज मदन बेले , कु .गायत्री विठ्ठल आडकिने
कु. समीक्षा प्रकाश कदम , स्वरित संदीप भालेराव आणि रोहन रवि गायकवाड तर इयत्ता ८ वी तील समर्थ सुनील शिकारी, प्रणव लक्ष्मण बोड्डेवार कु. हर्षदा हरिप्रसाद मुरक्या , वेदांत दयानंदा अलोणे , कु.इशिका शिवाजी देशमुख
हे इयत्ता ५ वी आणि इयत्ता ८ वी तील एकूण १५ विद्यार्थी ही परीक्षा गुणवत्तेत पास झाले असून शिष्यवृत्ती धारक बनले आहेत
वरील सर्व शिष्यवृत्ती धारक विद्यार्थ्यांचे वसमत पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी shri संजय ससाणे , विस्तार अधिकारी तान्हाजीराव भोसले , केंद्रप्रमुख वराड सर यांनी कोतुक केले आहे
शाळेचे संस्थापक प्रा डॉ नामदेव दळवी , मु अ गोविंद दळवी , संचालिका मीना इंगोले , शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी , पालक यांनी अभिनंदन केले आहे